रोटेगावला महत्वाच्या रेल्वे थांबाव्या म्हणून रेल्वे महाव्यवस्थापक यांना निवेदन

KHOZ MASTER
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे दोन तालुक्याचे मुख्यालय आहे,येथून पुणे,मुंबई,हैदराबाद,  नांदेड नागपूर येथे अनेक व्यापारी यांची ये-जा असते,पुण्या -मुंबईला दररोज पन्नास नागरिक जातात,त्यांना रोटेगाव येथून रेल्वेने जाणे,-येणे सोयीचे आहे, यामुळे रेल्वे उत्पन्न वाढेल ,जवळपास ऐंशी हजार लोकसंख्या असलेल्या वैजापूर  करांसाठी नांदेड-पुणे एक्सप्रेस, जालना- मुंबई,जनशताब्दी एक्सप्रेस, नरसापूर-नगरसुल,व तिरुपती-नगरसुल एक्सप्रेस गाड्याना रोटेगाव थांबा द्यावा या मागणी साठी वैजापूर वाशीयांच्या वतीने शुक्रवार दि.१०/१२/२२ रोजी रोटेगाव येथे सिकंदराबाद (द.म.रे)चे महाव्यवस्थापक अरुनकुमार जैन आले असता त्यांना वरील मागण्याचे निवेदन देऊन वरील रेल्वे रोटेगाव येथे थांबविण्याची विनंती करण्यात आली, त्यांनी निवेदन देणाऱ्या नागरिकांशी खुल्या मनाने संवाद न साधल्या मुळे व मागणी काळजी पूर्वक न ऐकल्याने नागरिक नाराज झाले ,या प्रसंगी प्रवाशी सेनेचे बाळू संचेती,भाजपा व्यापारी संघाचे निलेश पारख ,शैलेश पोंदे हेडगेवार बँकचे प्रशांत कंगले , विनोद भाटिया श्री तोष्णीवाल, गौरव दौडे,भाजपा गट नेते,दशरथ बनकर,राजेश गायकवाड, गिरीश चापानेरकर, दामोदर पारीख, राम पिलदे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, ए,बी,शेख, यांनी महाव्यवस्थापक यांच्या संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी वेळ दिला नाही,या समयी परसोडा येथील शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा निवेदन दिले,(फोटो कॅप्शन-निवेदनाची दुसरी प्रत रोटेगाव रेल्वे स्टेशन मास्टर यांनाही देण्यात आली,या प्रसंगी बाळू संचेती,निलेश पारख,दिनेश राजपूत,दशरथ बनकर,राजेश गायकवाड, धोंडीराम राजपूत,व इतर मान्यवर उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *