चिखली शहर कॉग्रेसकडुन ना.चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध

चिखली
गत काही दिवसापासुन भाजपाचे नेते व मंत्री सतत महापुरूषांच्या विरोधात अवमानकारक शब्द काढुन त्यांचा वारवांर अवमान करीत आहेत. राज्यपाल कोष्यारी, तथा भाजपा प्रवक्ते सुधांषु त्रिवेदी यांचा चिखली शहर कॉग्रेसच्या वतीने यापूर्वी अषाच बेताल वक्तव्य प्रकरणी निषेध करण्यात आला होता. नुकताच राज्याचे उंच्च व तंत्र षिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कर्मवीर भाउराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महत्मा ज्योतीबा फुले यांनी भिक मागून शाळा सुरू केल्या, असे अवमानकारक वक्तव्य करून महापुरूषांचा अपमान केला. चंद्रकांत पाटील यांच्या या बेताल वक्तव्यावरून संतप्त झालेल्या शहर कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा बाजी करून नामदार चंद्रकात पाटील यांच्या प्रतिमेला चपलेचा हार टाकुन निषेध नोंदविला आहे. यावेळी शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अतहरोद्यीन काझी यांनी निषेध नोंदवित ‘भाजपाने वाचाळविरांच्या जिव्हेला लगाम लावावा’ अन्यथा वेळप्रसंगी तिव्र आंदोलन करण्याचा ईषाराही यावेळी दिला आहे.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र षिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले व कर्मवीर भाउराव पाटील यांचे विरूध्द जे अनुदगार काढले त्याचा चिखली शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने आज जयस्तंभ चौक चिखली येथे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबांधीत करतांना शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अतहरोद्यीन काझी म्हणाले की, गत काही दिवसापासुन भाजपाचे वाचाळविर नेते व मंत्र्यांनी महापुरूषांच्या विरूध्द गरळ ओकण्याचा सपाटाच लावला आहे राज्यापाल कोष्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांषु त्रिवेदी यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती षिवाजी महाराज यांच्या प्रती अवमानकारक शब्द वापरले, तर नुकतेच राज्याचे उच्च व तंत्र षिक्षण मंत्री यांनी चक्क पुरूषांनी भिक मागुण शाळा उभ्या केल्या असे म्हणुन महापुरूषांचा एक प्रकारे अवमानच केला आहे. ना.पाटील यांनी देषामध्ये शाळा कोणी चालु केल्या, कर्मवीर भाउराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महत्मा ज्योतीबा फुले यांनी असे सांगीत सरकारी मदतीवर कषाला अवंलबुन राहता असे प्रष्न उपस्थितीत करून चक्क महापुरूषांचा अपमान केला आहे. यापुढे राज्यातच काय पण देषातील कोणत्याही जाती, पंथ धर्माच्या महापुरूषांचा अवमान कॉग्रेस पक्ष सहन करणार नाही असे ठनकावून सांगित भाजपाने वाचाळविरांच्या जिव्हेला लगाम लावावा अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईषारा दिला आहे.
यावेळी नामदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करीत प्रचंड घोषणा बाजी करण्यात येवून त्यांच्या प्रतिमेला चपलांनी बडविण्यात आले आहे. यावेळी शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. मोहमंद इसरार, कुणाल बोंद्रे, नगरसेवक रफिक सेठ, आसिफ भाई, राजु रज्जाक, दिपक खरात, गोपाल देव्हडे, यांच्यासह सचिन बोंद्रे, विजय जागृत, सचिन शेटे, पप्पु जागृत, खलील बागवान, राजेष खरात, अॅड प्रषांत देषमुख, भास्कर चांदोरे, शेख जाकीर, अभय तायडे, प्रषांत भटकर, दत्ता करवंदे, नाजिम खान,कैलास जंगले, अकिल भाई, मोहीत घुगे, शेख आजिम, किषोर थोरात, उमेष खरे, मनोज म्हस्के, सोनु सावळे, नितीन सावळे, संर्घष तरकसे, शेख अबजल, गौरव मुंडलीक, प्रताप कांबळे, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिीती होती.
भाजपाने वाचाळविरांच्या जिव्हेला लगाम लावावा – अतहरोद्यीन काझी
0
9
4
7
1
9
Users Today : 8
Leave a comment