बॅटरी चोरणारी टोळी  : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

Khozmaster
4 Min Read
प्रविण चव्हाण 
बॅटरी चोरणारी टोळी, नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दोन आरोपी व दोन अल्पवयीन मुद्देमालासह मोटार सायकल हस्तगत…
          सविस्तर माहिती अशी कि, मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर, शहादा, तळोदा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीस अधीक्षक. पी.आर.पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा पध्द्तीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते.
  पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणे हे मोठे आवाहन होते. त्याअनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत.
   पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
    दि. 02 व 03 डिसेंबरच्या रात्री 10: 00 वाजेच्या. दरम्यान उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील वडझाकण येथील विकास भरत पाडवी यांचे अंगणातून 8000/- रु. कि. ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात आरोपीतांनी चोरुन नेली म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे 398/2022 भादंवि क 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
     स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, सुमारे 8 दिवसापूर्वी वडझाकण येथील ट्रॅक्टरची बॅटरी खामगांव येथील राहुल भिल व त्याचे इतर साथीदारांनी चोरलेली आहे व नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात मोटार सायकल वर घेवून ती विक्री करण्यासाठी येणार आहे.
     त्यावरून पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ संशयीत इसमास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
   स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात शोध घेतला असता एक संशयीत इसम मिळून आला. राहुल लक्ष्मण भिल (वय-22) रा. खामगांव ता.जि. नंदुरबार असे. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या बॅटरी व मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता. त्याने वडझाकण येथील ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी त्याचा साथीदार  परेश पाडवी रा. पापनेर ता.जि. नंदुरबार व इतर तीन साथीदारांच्या मदतीने केली असल्याचे सांगितले. म्हणून त्याच्या ताब्यात मिळून आलेली गुन्ह्यातील 8000/- रुपये किमंतीची ट्रॅक्टर बॅटरी व 20,000/- रुपये किमतीची मोटार सायकल असा एकुण 28,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे.
   तसेच गुन्ह्यातील त्याचे साथीदार  परेश पाडवी व इतर तीन साथीदारांचा रा. पापनेर ता.जि. नंदुरबार यांचा शोध घेतला असता ते मिळून आले. परेश परविन पाडवी (वय-23 )व दोन अल्पवयीन सर्व रा. पापनेर ता.जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांना वडझाकण येथील ट्रॅक्टरची बॅटरी चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी देखील चोरी केल्याचे सांगितल्याने. राहुल लक्ष्मण भिल (वय-22) रा. खामगांव ता.जि. नंदुरबार, परेश परविन पाडवी (वय-23) व दोन अल्पवयीन रा. पापनेर ता.जि. नंदुरबार.
     यांना मुद्देमालासह गुन्ह्याच्या पुढील तपास कामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर ची कामगिरी नंदुरबार  पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक  निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो. हवालदार महेंद्र नगराळे, पो. नाईक विशाल नागरे, मोहन ढमढेरेे, पो. शि. शोएब शेख, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *