शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार थांबविले..

Khozmaster
1 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत , असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून त्यानुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे ,
  अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी केली .
       विजय सिंघल म्हणाले की , महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे . त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते . तथापि , शेतकऱ्यांवर अतिवृष्टी व पूरपरिस्थिती अशी आलेली संकटे आणि सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये ,
  असा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला . त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे .
0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *