प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
कथित खून प्रकरणात जामीन मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत . याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा भा . द . वी . कलम ३०२ प्रमाणे पोलीस स्टेशन धडगाव येथे नोंदविला होता . थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी की , फिर्यादीची मुलगी ही एका सूतगिरणीत कार्यरत होती . ती भविष्य निर्वाह निधीची रक्कम घेण्यासाठी बाहेरगावी गेली होती . फिर्यादीची दुसरी मुलगी ही सतर्क संपर्कात होती . परंतु त्यानंतर संपर्क झाला नव्हता . फिर्यादीला वाटले की , मावशीच्या घरी धडगावला थांबली असेल . परंतु साक्षीदाराने फिर्यादीच्या पुतण्याला कळविले की , काही कागदपत्रे घटनास्थळावर मिळून आले आहेत . फिर्यादीच्या वडिलांनी शोध घेतला असता कागदपत्रांसोबत मुलगी मयत अवस्थेत आढळली .
फिर्यादीने सदर फिर्याद अज्ञात व्यक्तीच्या नावाने नोंदविली होती . परंतु पुढील जबाबात आरोपीचे नाव घेण्यात आले होते . आरोपीची १२ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली होती . सदर प्रकरणात आरोप पत्रही दाखल करण्यात आले होते.संशयित आरोपीने सत्र न्यायालय शहादा , जामीन मंजूर करण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता . परंतु सत्र न्यायालय शहादा , यांनी सदर अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते . सदर आदेशाविरुद्ध अर्जदार मनोज वळवी , रा . अक्कलकुवा , यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जामीन अर्ज दाखल केला होता . सदर प्रकरणात जामीन न देण्यासाठी हस्तक्षेप अर्जही दाखल केला होता . मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस . जी . मेहरे ) यांनी ७ डिसेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये जामीन मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले . अर्जदारतर्फे अॅड . गजेंद्र देवीचंद जैन यांनी काम पाहिले .
Users Today : 9