नवापुत नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणावर मुख्याधिकारी यांची दबंग कारवाई

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार

नवापुत नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणावर मुख्याधिकारी यांची दबंग कारवाई अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे . नवापूर शहरात अतिक्रमण मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे नगर परिषद हद्दीतील लाईट बाजार परिसरात मुख्य रस्त्यावर काही दिवसा पूर्वी केलेले अतिक्रमण आज मुख्याधिकारी स्वप्रील मुदलवाडकर , अभियंता सदांशीव , आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्मचारीच्या सहकार्याने jcb च्या साह्याने काढन्यात आले असून घंटा गाडी च्या टाकून लोखंडी मटेरिअल जप्त करणयात आले असून नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका गणेश बच्छे , रमेश पावरा यांनी चोख बंदोबस ठेवला होता . या प्रसंगी लाईट बाजार भागात बघ्यानी चांगलीच गर्दी केलेली दिसून आली होती . महात्मागांधी पुतळा परिसर जुनी भतवाल टॉकीज जवळ तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि स्टेट बँक परिसरात लावलेले बेनर व मंडप पाईप ही जप्त करण्यात आल्याने नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या कारवाईने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर अतिक्रमाण धारकामध्ये दहशत निर्माण झाली आहे .

0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *