प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
शहादा तालुक्यातील कमरावद येथे पोलिस , जिल्हाधिकारी व वनक्षेत्रपाल यांच्याकडे तक्रारी अर्ज केल्यचायिा कारणावरुन एकास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा तालुक्यातील कमरावद येथील कृष्णा ब्रिजलाल कोळी यांनी पोलिस अधिक्षक , जिल्हाधिकारी व शहादा वनक्षेत्रपाल यांच्याकडे तक्रारी अर्ज केला . या कारणावरुन कृष्णा कोळी यांच्या घरात विकास शांताराम कोळी , दीपक शांताराम कोळी , भटू शांताराम कोळी , भैय्या राजाराम कोळी , शांताराम शंकर कोळी , राजाराम शंकर कोळी , कविता भटू कोळी व ताईबाई नामदेव कोळी यांनी अनाधिकृतपणे प्रवेश केला.तसेच विकास कोळी व दीपक कोळी यांनी कृष्णा कोळी यांना काठी व हाताबुक्यांनी मारहाण केली . इतरांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली . याबाबत कृष्णा कोळी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम १४३ , १४७ , ४५२ , ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत .
Users Today : 8