प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही . जगात स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षण घ्यावेच लागेल . आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा टक्का पाहिजे तसा वाढला नाही , त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी १ हजार क्षमतेचे मुलांचे व ५०० क्षमतेचे मुलींची आश्रमशाळा बांधण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालय , आदिवासी वसतिगृह भूमिपूजन आणी मुलींचे वसतिगृह लोकार्पण प्रसंगी सांगितले .
पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार प्रा . अशोक उईके , संजीव रेड्डी बोदकुरवार , आदिवासी अप्पर आयुक्त सुरेश वानखडे , प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन , नगराध्यक्ष वैशाली नहाटे , आदिवासी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उज्वल डाबे उपस्थित होते.शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांनाही उत्तम दर्जाच्या शाळा , चांगल्या सुविधा आणि शिक्षक देण्याचा प्रयत्न आहे . म्हणूनच आश्रमशाळेच्या इमारती सुसज्ज आणि परिपूर्ण बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे . शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे व्यवसाय किंवा नोकरी देण्यासाठी अॅप तयार करण्यात येईल . त्या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यावर त्या पद्धतीचे व्यवसाय शिक्षण त्यांना देण्यासाठी योजना तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले . स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण अकॅडमी तसेच खेळाडूंसाठी स्पोर्ट्स अकॅडमी तयार करण्यात येणार आहे.आश्रम शाळा सीबीएसई अभ्यासक्रमाप्रमाणे राबविण्याचा प्रयत्न असणार आहे . उत्पन्नाच्या आधारे स्मॉल स्केल इंडस्ट्री काढुन त्यात आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने योजना आखण्यात येत असल्याचेही श्री . गावित यांनी सांगितले . आश्रम शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी शाळेतच नियमित उपस्थित राहावेत , यासाठी आश्रम शाळेच्या आवारातच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले . सर्व आदिवासी बांधवांना त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी त्यांनी दिली . आदिवासी बांधवांना शेतीत चांगले उत्पन्न काढण्यासाठी मेहनतीने शेती करावी , त्यासाठी लागणाऱ्या सुविधा त्यांना पुरविण्यात येईल , असे आवाहन त्यांनी यावेळी केले . जनगणनेच्या वेळी प्रत्येक आदीवासी बांधवाने त्यांचे नाव नोंदवले जाईल याची काळजी घ्यावी . कारण या माहितीच्या आधारावरच आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तयार होणार आहेत असे विजयकुमार गावित म्हणाले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आश्रम शाळेतील इयत्ता दहावी व बारावीतील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच ई – रिक्षा चे वाटप , दालमील , शेळीपालन , सूक्ष्म सिंचन , वैयक्तिक व सामूहिक वन हक्क पट्टे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले . त्याचबरोबर सामूहिक वन हक्कचा चांगला आराखडा तयार करणाऱ्या गावांनी आराखड्याची प्रत मंत्री महोदयांना सादर केली . यावेळी प्राध्यापक अशोक उड़के आणि संजीव रेड्डी बोदकुरवार यांनीही मनोगत व्यक्त केले .
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक याशनी नागराजन यांनी केले .
Users Today : 8