प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रसंगी पक्षाचा व्हीप झुगारुन विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या अनर्हतेबाबत दि . 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या दालनात सुनावणी झाली.मात्र यावेळी बाजू फुटलेल्या काँग्रेस व मांडण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थितन सल्याने पुढील सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे.जिल्हा परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक , निलुबाई नटवरसिंग पाडवी , सुरैय्याबी अमीन मक्राणी , हेमलता अरुण शितोळे , प्रकाश फकिरा कोकणी यांनी गटनेते सी.के.पाडवी यांनी काढलेला पक्षादेश झुगारुन विरोधी उमेदवाराला मतदान केले.याबाबत गटनेता सी.के. पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 व 7 नुसार संबंधीतांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली होती . या तक्रारी बाबत दि .9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या दालनात सुनावणी झाली.यावेळी फुटलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थित नव्हते . मात्र प्रस्ताव दाखल करणाऱ्यांचा बाजूने संभाजीनगर येथील वकील होते.फुटलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थित नसल्याने ही सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे . या तारखेला वकील आणावा तरच युक्तिवाद ऐकला जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या . यावेळी शिवसेनेचे प्रतोत अॅड . राम रघुवंशी उपस्थित होते .
Users Today : 8