पगार ..
(लालपरी)
खडखडे लालपरी
धावतेयं रस्त्यावर
कर्मचारी ते बिचारे
संसार ये रस्त्यावर
वाढत राही तोटा
तिजोरीवर ये भार
इतरां मिळे बोनस
यांचा लांबतो पगार
तिकडे हो पक्वान्न
इकडची चूल गार
दिवाळी रे सर्वांची
करावाजरा विचार
घरात बसूनि कुणी
कमावतो भारंभार
सोडवला अंतीप्रश्न
लेकरे देती आभार
कायमचा घालवारे
लालपरीचे आजार
नेहमी तीचंसमस्या
का करता बेजार
शिवनेरी शिवशाही
भरला नवा दरबार
विठाई न् लालपरी
कात टाकली दुबार
वर्षे येई पंचाहत्तर
लालपरी कारभार
ई वाहन शिवाई ते
आणेल नवा उभार
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
Users Today : 26