निकाल ..
शिकवी खूप काही
निवडणूक निकाल
अंतर्मुख होता जरा
बरेचं काही शिकालं
हतबध्द स्तब्ध होता
जगणे होई बकाल
हरण्यात सुध्दा सुख
आनंद तोचं मुकाल
दोष देता दुसऱ्याला
चुका किती झाकालं
आपली चूक कळता
सहजपणे रे झुकाल
जनतेची जोडा नाळ
स्पर्धेत छान टिकालं
दूर दूर फेकले जाल
जन व्रत जर टाकाल
लोककल्याणयोजना
विचार तिन्हीत्रिकाल
मतदाता हाच सम्राट
ध्यान ठेवा चिरकाल
अरे हार जर पचवालं
पुन्हा उद्या जिंकाल
रात्रीच्या गर्भात असे
उद्याचा तो उषःकाल
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
Users Today : 26