फर्दापूर येथील आरोपीची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस देणार; फर्दापूर पोलिसचे आवाहन 

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील १६ वर्षीय बालिकेला पळवून नेणाऱ्या आरोपीचा किंवा १६ वर्षीय बालीकेचा शोध घेणाऱ्या किंवा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयाचे बक्षीस फर्दापूर पोलिस स्टेशनच्या वतीने सपोनि देवीदास वाघमोडे यांनी जाहीर करण्यात आले असून आरोपीचा किंवा बालीकेचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता सर्व गुप्त ठेवला जाणार असल्याची माहिती फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी दिली आहे १८ ऑगस्ट २०२१ रोजी आरोपी राहुल शिवसिंग महेर याने पळासखेडा येथील सोळा वर्षीय माधुरी नामक बालिकेला पळवून नेले होते या प्रकरणी १९ ऑगस्ट २०२१ रोजी माधुरीच्या वडीलाच्या फिर्यादी प्रकाश दलपत शिंदे वरून फर्दापूर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल शिवसिंग महेर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी या गुन्हा यातील आरोपी राहुल महेर व
सोळा वर्षीय माधुरीचा सर्वत्र शोध घेतला मात्र आत्तापर्यंत ते मिळून आलेले नाही या पार्श्वभूमीवर आरोपी राहुल महेर किंवा सोळावर्षीय माधुरीचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयाचे बक्षीस फर्दापूर पोलिसांनी जाहीर केले असून याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव वो पता गुप्त ठेवला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे दरम्यान आरोपी राहुल महेर किंवा सोळावर्षीय माधुरी बाबत माहिती असणाऱ्या व्यक्तीने सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे किंवा पोलीस नाईक निलेश लोखंडे यांना तात्काळ संपर्क साधावा असे आव्हान फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी केले आहे.
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *