सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर ,राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका जाहीर कार्यक्रमात क्रांतीसुर्य महात्मा फुले , भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अपशब्द काढले , या प्रकरणी क्षत्रिय माळी समाज संघटनेच्या वतीने पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले .
क्षत्रिय माळी समाज संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानदेव करवंदे , तुषार बनकर यांनी तीव्र शब्दात चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला . यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष योगेश बनकर , दीपक जाधव , आशिष माळी , रोशन चौधरी , रोशन भडांगे , ईश्वर बनकर , पुंडलिक भडांगे , शंकर सोनवणे , बाबुराव क्षीरसागर , श्रावण घोंगडे ,महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे जिल्हा सचिव शंकर भामेरे , चेतन रोकडे , सुनिल घोलप , यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Users Today : 65