पहूर येथील प्रयोगशील शिक्षक शंकर भामेरे  यांना एम . फिल पदवी जाहीर 

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील प्रयोगशील शिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांना  डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे शिक्षण शास्त्र विषयात एम फिल .पदवी जाहीर झाली .त्यांनी विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र विभागाचे जेष्ठ प्राध्यापक  डॉ .  सुहास पाठक  यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यातील पहूर गावातील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेच्या शब्द संपत्तीवर होणाऱ्या भाषिक खेळांच्या परिणामकारकतेचा  अभ्यास या विषयावर संशोधन
प्रकल्प विद्यापीठास सादर केला होता.शंकर रंगनाथ भामेरे हे पहूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात गेल्या १७ वर्षांपासून इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .  विद्यार्थ्यांना  इंग्रजी भाषेची गोडी लागावी, श्रवण –  संभाषण – वाचन -लेखन – ही भाषेची मूलभूत कौशल्ये विकसित व्हावी , विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेविषयीचा न्यूनगंड दूर व्हावा यासाठी त्यांनी विविध भाषिक खेळांची निर्मिती केलेली आहे.भाषिक खेळातून विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढविण्यासाठी  ज्ञानरचनावादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी  दैनंदिन अध्यापनात उपयोग केला आहे.कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विविध भाषिक खेळ मोलाचे ठरत आहेत .
त्यांनी इंग्लिश लर्नर्स क्लब स्थापन करून
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण केली आहे .  त्यांनी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा आणि चर्चासत्रांमध्ये शोध निबंध सादर केले  असून  सध्या ते दिल्ली येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग आणि आयनेट संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या  ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी सुरू असलेल्या ( इ एल टी ) राष्ट्रीय संशोधन  प्रकल्पात सहभागी झाले आहेत . नागपूर येथे या प्रकल्पाची  कार्यशाळा नुकतीच पार पडली . शिक्षणशास्त्रात संशोधन करण्याची ईच्छा असल्याचे त्यांनी बोलताना सांगीतले.त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *