शाईफेक असमर्थनीय,प्रकरणाचे खापर पत्रकारांवर संतापजनक

Khozmaster
2 Min Read
पत्रकारिता करणे गुन्हा आहे का? – एस.एम. देशमुख मुंबई
पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय.. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रत्येक सूज्ञ आणि लोकशाही प्रेमी व्यक्ती निषेधच करील.. मात्र या शाईफेक प्रकरणाचं खापर पत्रकारांवर फोडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे. शाईफेक प्रकरणाची चौकशी व्हावी आमचा विरोध नाही मात्र आपलं काम करणाऱ्या माध्यमांना नाहक त्रास देऊ नये ते आम्ही खपवून घेणार नाही..असा इशारा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील म्हणतात, “शाईफेक प्रकारचं छायांकन एवढं व्यवस्थित कसं केलं गेलं? एवढा अचूक अँगल कसा घेतला गेला? म्हणजे तो पत्रकारच शाईफेक प्रकरणामागचा मास्टरमाईंड आहे.. त्याला अटक झाली नाही तर मी पोलीस स्टेशन समोर उपोषण करतो” .. दादा, बातमी आणि छायाचित्र टिपणं हे पत्रकारांचं कामच आहे.. ते पत्रकाराने अचूकपणे केलं असेल तर पत्रकाराला तुम्ही मास्टर ठरवता? अनेकदा दंगली घडताना, मारामारी, मर्डर होत असताना पत्रकार घटनास्थळावर हजर असतात म्हणजे त्या घटनांमध्ये पत्रकारांचा हात असतो का? ऑन दी स्पॉट रिपोर्टींगचा अर्थ काय? पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याने गोविंद वाकडे यांच्या अटकेचा आणि सरकारी दमन नितीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने एस.एम. देशमुख यांनी निषेध व्यक्त केला.
0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *