तेलंगणा राज्यात महाराष्ट्रातील लोकांना का राहायला जावेसे वाटते…?

Khozmaster
3 Min Read
पुणे (संजय धाडवे) 
सध्या महाराष्ट्रातून फुटून आम्हाला शेजारच्या राज्यात जायचे अशी चर्चा सुरू आहे.याबाबत नांदेड,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती जिल्ह्यातील अनेक लोक तेलंगणा राज्यात जाण्याबाबत उत्सुक आहेत.याविषयी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी एक फेसबुक पोस्ट केली त्यावर त्या सीमावर्ती जिल्ह्यातील अनेकांनी तपशीलवार अनुभव लिहिले आहेत ते सर्वांनी जरूर बघावेत.बिलोली, देगलूर येथील अनेक कार्यकर्त्यानी ४८ गावे तेलंगणाला जोडावेत म्हणून पदयात्रा काढली आहे…सीमेवरील अनेक कुटुंबे आता राहायला तिकडे जात आहेत. तिकडचे आधारकार्ड बनवून घेणे, तिकडचे रेशनकार्ड बनवून घेण्याचे प्रमाण वाढते आहे. हॉटेलमध्ये काम करायला मोठ्या संख्येने तरुण जातात.तेलंगणा राज्याचे इतके आकर्षण का आहे ? याविषयी  माहिती घेतली, चर्चा केली तेव्हा महाराष्ट्रापेक्षा अनेक कल्याणकारी योजना तिकडे आहेत हे बघून थक्क व्हायला होते.
१) आपल्याकडे निराधार वृद्ध व्यक्तींना पेन्शन फक्त १००० रु मिळते तर तेलंगणा राज्यात ते ३००० मिळते
२) शेतीसाठी मोठे प्रकल्प लिफ्ट योजना करून बहुतेक शेती सिंचनाखाली आणली
३) शेतकऱ्याला एकरी अनुदान १०,००० रुपये दिले जाते
४) शेतीला १८ तास मोफत वीज दिली जाते
५)शेतकरी कुटुंबातील १८ ते ५९ वर्षातला कोणीही मृत्यू झाला तर ११ व्या दिवसाच्या आत ५ लाख रुपये घरी पोहोच केले जातात.
६) लक्ष्मी कल्याण योजनेत १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलीचे लग्न ठरल्यावर तिला १ लाख १६ हजार रुपयांची मदत दिली जाते.गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला हा आधार ठरतो.
७) सर्व धनगर कुटुंबातील व्यक्तींना १० शेळी व एक बोकड दिला
८)दलित तरुणांना २३ दिवसात १० लाख रुपये
रोजगारासाठी दिले जातात.आतापर्यंत ८७२० दलित तरुणांना ही मदत दिली
९) बाळंतपण झालेल्या महिलांना १२००० रुपये मदत दिली जाते
१०)पीकविमा योजनेत सर्व  रक्कम सरकार भरते
११)घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी १रुपये किलो दराने ६ किलो धान्य दिले जाते .अशा कितीतरी कल्याणकारी योजना आज तेलंगणा मुख्यमंत्री अंमलात आणत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच मोठ्या संख्येने सीमावर्ती जिल्ह्यातील गावे आज तेलंगणात जाण्याची भाषा करत आहेत…
याला महाराष्ट्रद्रोह समजण्यापेक्षा त्या माणसांची भावना समजून घेतली पाहिजे.तुम्ही विकास करत नसाल तर  जिथे विकास होतो आहे तिथे आम्हाला जाऊ द्या..तेव्हा महाराष्ट्रप्रेमी सरकारने केवळ अस्मितेची दमदाटी न करता तेलंगणा सरकारच्या योजनांचा अभ्यास करावा व येत्या बजेटमध्ये या योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्रात करावी तरच सीमावर्ती भागातील हे स्थलांतर रोखले जाईल.तेलंगणाचे मुख्यमंत्री आता महाराष्ट्रात त्यांच्या विकासाच्या योजना महाराष्ट्रात आणून त्यांचा पक्षही इकडे आणत आहेत.मध्यंतरी त्यांनी देशातील सर्व शेतकरी नेते बोलावून त्यांच्या शेतीविषयक योजनांचा परिचय करून दिला. आपल्या परभणीचे शेतकरी नेते Manik Kadam सध्या त्यांच्यासोबत काम करत असून ते महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून काम करत आहेत.लवकरच महाराष्ट्रात केसीआर यांचे दौरे सुरू होत आहे. विकासाचा अजेंडा घेऊन ते देशभर जात आहेत…ते असेना का पण आपल्या सीमावर्ती जिल्ह्यातील स्थलांतर थाम्बवायचे तर तिकडच्या विकास योजना इकडे अंमलात आणायला हव्यात. माणिक कदम यांच्याशी जरूर बोलून बदलता तेलंगणा समजून घ्यावा
0 9 4 5 6 1
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *