बाटलीबंद ..
महा पुरुष अवमान
वक्तव्यं करे बेबंध
वाचत ना इतिहास
आम्ही असले अंध
पुकारावा लागतोयं
हरताळ आणि बंद
वाचाळ तोंडे अनेक
कधी होणार रे बंद
माफी हवी कितीदा
रे पुन्हाजिव्हा बेधुंद
क्षमामागे खाजगीत
प्रकाश असता मंद
रे अंकुश हरवण्यात
लाभे कसला आनंद
मराठी भाषा लाघवी
तो ओतप्रोत मकरंद
शान आन घालवतो
कसे होतोयं मद्यधुंद
कुणी म्हणे प्रसिध्दी
जडला आगळा छंद
एका पाठोपाठ दुजा
आखाड्यासुंदोपसुंद
वाक्विचार स्वतंत्रता
वातावरण बने कुंद
चालत राहीलंअसेचं
राहिला नसे धाराबंद
सळसळत्या शब्दांना
करे आता बाटलीबंद
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
Users Today : 26