सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात पौष्टिक तृणधान्ये वषाॅनिमित्त शेतीशाळा माध्यमातून रब्बी ज्वारी बाबत सोयगाव कृषी विभागाच्या वतीने नांदगाव व वरखेडी येथे मार्गदर्शन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत तालुका कृषि अधिकारी तथा मंडळ कृषि अधिकारी बनोटी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी ज्वारी पिक शेतीशाळा मौजे – नांदगाव व वरखेडी बु येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुढील वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावयाचे असल्याने शेतीशाळा माध्यमातून पुढील वर्षाची पूर्वतयारी म्हणून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.
सदरील शेतीशाळा मौजे – नांदगाव येथे दिनांक – २७-१०-२०२२ ते २६-०१-२०२३ तसेच मौजे वरखेडी खु येथे दिनांक – २३-१०-२०२२ ते २७-०१-२०२३ या कालावधीत राबविण्यात येत असून यात रब्बी ज्वारी पिकातील विविध अवस्थांचा विचार करून त्यानुसार बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, शेतकरी निवड, माती व पाणी परीक्षण, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, कामगंध सापळयांचा वापर, मित्रकीटक माहिती, किड व रोग व्यवस्थापन, किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, उत्पादन खर्च ताळेबंध या बाबतची माहिती वर्गवार देण्यात येत आहे.आज दिनांक १४-१२-२०२२ रोजी मौजे – नांदगाव येथे रब्बी पिक शेतीशाळेचा वर्ग आयोजित करण्यात आलेला होता यात प्रामुख्याने एच.बी.देशमुख कृषि पर्यवेक्षक, ए.एस.महाजन बी.टी.एम, एस.जी.वाघ कृषि सहाय्यक तिडका, एस.आर.पाटील कृषि सहाय्यक बहुलखेडा यांनी मार्गदर्शन केले तसेच आजच्या शेतीशाळा वर्गास गावातील सरपंच व उपसरपंच व प्रगतीशील शेतकरी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
