औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जिल्ह्यातील सिल्लोड येथे येत्या 1 जानेवारी पासून सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापले कार्यालय तसेच नगर परिषदेने शहरातील प्रत्येक चौकात तसेच दुभाजकांवर व सार्वजनिक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, लायटिंग सह सुशोभीकरण करावे तसेच शहर वासीयांनी देखील आपले घर , व्यापार व संस्थेस लायटिंग व सजावट करावी असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे .सिल्लोड मध्ये कोणत्याही प्रकारचे उत्सव मेळावे होत नसल्याने सिल्लोड महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव दिशा दर्शक ठरावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन महोत्सवात सहभागी व्हावे असे देखील मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.सिल्लोड येथे 1 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या सिल्लोड महोत्सवाच्या अनुषंगाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सिल्लोड शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम, व कृषी महोत्सवाच्या नियोजित मैदानाची पाहणी केली. तसेच त्यानंतर सिल्लोड नगर परिषदेच्या सभागृहात सिल्लोड महोत्सवाबाबत आढावा घेतला. याप्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वरील अवाहन केले.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे , युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास पा.लोखंडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, नॅशनल सुत गिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील , संचालक राजेंद्र ठोंबरें, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, धन्वंतरी असोसिएशनचे डॉ. निलेश मिरकर, हाजी मोहमद हनिफ, मुश्ताक देशमुख, प्रवीण कटारिया, शेख इम्रान ( गुड्डू ) , मुख्याधिकारी सय्यद रफिक, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रउफ बागवान, शंकरराव खांडवे, सत्तार हुसेन, सुधाकर पाटील, अकिल वसईकर, प्रशांत क्षीरसागर, आसिफ बागवान, सुनील दुधे, जुम्मा खा पठाण, राजू गौर, रईस मुजावर, रतनकुमार डोभाळ, शेख सलीम हुसेन, जितू आरके, मोईन पठाण, मनोज झंवर, मतीन देशमुख, बबलू पठाण यांच्यासह वीज वितरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, अभियंता सचिन बन्सोडे, अनिल सैवर, न.प. उप मुख्याधिकारी सुनील गोराडे, प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, अभियंता अश्विन चव्हाण, राहुल राजपूत, शेख सलमान, शेख अजीम आदींची उपस्थिती होती.
Users Today : 39