पद्मविभूषण..
(स्व रावत )
रावत बिपीन योग्य
शोभले पद्मविभूषण
पुरस्कारा मिळे मान
असे ते भारत भूषण
आपली ये आठवण
काळही करी स्मरण
सपत्नीक तुज नेता
झुरले असेल मरण
अद्भुत व्यूहरचना ती
आलेअतिरेकी शरण
आपण सरसेनाध्यक्ष
सैनिकाआले स्फुरण
समन्वय तिन्हीदलांत
साधलेले एकीकरण
लष्करात नव आयुधे
केलेआधुनिकीकरण
कोसळे हेलिकॉप्टर
कोसळे दुःख दारुण
आगआग होअंगाची
पसरला धूर कारूण
सखोल दीर्घअभ्यास
लाजवले राजकारण
मावळला विरोध तो
लष्कर सक्षमीकरण
भेकड चिनी पाकडे
तू केलेस चीर हरण
थिएटरकमांडनिर्माण
दूरदर्शी सक्षम धोरण
अकाली जाण्याने ती
पोकळीकेली निर्माण
इतिहास करीलं नोंद
लक्षात राही निर्वाण
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306096.
Users Today : 26