साजा वडगांव येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात

Khozmaster
2 Min Read
वाशिम
मौजे साजा वडगांव येथील तलाठी आशिष प्रदीप सावंगेकर, तहसील कार्यालय मानोरा जि.वाशिम यांनी लाच मागितल्या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. यातील तक्रारदार  यांचे आजीचे  नावे असलेली 5 एकर शेती बक्षिस पत्रा व्दारे आजीचा पनतु यांचे नावे करण्यासाठी  बक्षिस पत्र करून त्याची फेरफार ला नोंद करण्याकरिता  यातील आलोसे तलाठी सावंगेकर यांनी दि.13/12/2022 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान 50,000/- रू. लाचेची मागणी करून तडजोड अंती 41,000/- स्विकारण्यास सहमती देवून पहिले 30,000/-रु. देण्याचे सांगुन फेरफार नोंद घेतल्यानंतर 11,000/-रु. देण्याचे सांगितले होते. त्यानुसार दि.14/12/2022 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान 30,000/- रु.लाच रक्कम  तलाठी आशिष सावंगेकर यांनी बळीराम नगर आमकिन्ही येथे स्विकारली. त्यावेळी                                                                                              यांना  ताब्यात घेऊन त्यांचे कडून लाच रक्कम जप्त करण्यात आली असून तलाठी आशिष सावंगेकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. श्री. मारोती जगताप, पोलीस अधीक्षक,  मा. श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.गजानन आर शेळके, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. वाशिम यांनी पोहवा/नितिन टवलारकर,  विनोद अवगळे,विनोद मारकंडे,दुर्गादास जाधव पोना/रविद्र घरत, योगेश खोटे यांच्या सह कारवाई केली. कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी  केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम, पोलीस उप अधीक्षक दुरध्वनी क्रं –  07252 235933, टोल फ्रि क्रं 1064,  मोबाईल क्र. 9423338424 तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *