पुस्तकाला

Khozmaster
1 Min Read
पुस्तकाला..
पुस्तकाला आपल्या
बनवायचे  वाद ग्रस्त 
रातो रात अनपेक्षित
रे विक्री होणारं मस्त 
टी आर पी वाढवाया
मार्ग सापडला  रास्त
जाहिरात बाजी नको
असे इलाज रे  स्वस्त
आग नको विझायला
पेटवायचे  रान जास्त
बिनपगारी पहारेकरी
घालती  चांगली गस्त
वादविवाद वाढवाया
करावी मात्र शिकस्त
ना  वाचणारी जनता
पुस्तके करीलं  फस्त
स्वातंत्र्यावरती घाला
वक्तव्य हो बिनधास्त
किरकोळपुस्तक करे
बड्या  ग्रंथास परास्त
आवृती अनेक छापा
हातोहात  खपे  दस्त
मिळेल नंतर  निश्चित 
साहित्यपुरस्कारमस्त
– हेमंत मुसरीफ पुणे 
 ९७३०३०६९९६
0 9 4 5 6 1
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *