घोट्याच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ..!!

Khozmaster
2 Min Read
सौ. प्रतिभाताई अनिल मोरे यांनी दिली गावच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही..
दिपक मापारी, रिसोड
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोटा ता. रिसोड येथील ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाचे उमेदवार सौ. प्रतिभाताई अनिल मोरे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ गावातील ग्रामदैवताला नारळ फोडून प्रचार सुरू केला असून या पॅनलचे अधिकृत उमेदवार म्हणून गायकवाड रेखा प्रभाकर, गोडघासे शीलाबाई प्रकाश, मोरे संदीप विठ्ठल, गायकवाड रुक्मिणी शिवाजी, लोखंडे निर्मला ओम, मोरे प्रदीप रामभाऊ, कांबळे अंबादास अशोक, मोरे दिपाली सुरेश,खुशालराव परबतराव गवळी, निवडणूक रिंगणात आहेत. घोटा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण या पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असल्याचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. प्रतिभाताई अनिल मोरे यांनी सांगून गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ गावातील दलित वस्ती मधील रोड स्मशानभूमी बांधून देऊ, गावातील नागरिकांना चांगले पाणी देऊ, उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने योग्य ते नियोजन करणे, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, गावातील निराधारांना निराधार मानधन योजनेच्या माध्यमातून निराधार मानधन सुरू करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे, गावातील आदीसह गावातील अंतर्गत रस्ते गटारीचे कामे या कामांना या कामांना प्राधान्य दिले जाईल. अशी ग्वाही याप्रसंगी देऊन सरकारच्या विविध योजना आता थेट ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी तयार झालेल्या आहेत त्या पारदर्शकपणे राबविण्याचा प्रयत्न केला जाईल..
*गावच्या विकासासाठी विविध..*
मी या माध्यमातून सर्व घोटा ग्रामस्थांना अश्वस्त करू इच्छिते की,मी माझे सर्व ग्रामपंचायत मधील सदस्य सहकारी,गावातील सुजाण नागरिक यांच्या सल्ल्यानुसार ग्रामपंचायत कारभार सुयोग्य पद्धतीने चालवू इच्छिते, माझ्या कार्यकाळा दरम्यान गावातील कोणत्याही व्यक्तीला गट-तट,पार्टी,समाज,वैचारिक मतभेद यांना समोर ठेवून पात्र योजनांपासून वंचित ठेवले जाणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देते. तसेच आम्ही गावातील प्रत्येक कुटुंबाला किमान एका तरी सरकारी योजनेचा लाभ पोहोचविण्याचा मानस अंगी बाळगून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. यासाठी कोणाकडूनही एक रुपयाची सुद्धा मागणी केली जाणार नाही. आम्ही सर्व घोटा गावच्या समृद्धीसाठी बांधिल आहोत,
अपेक्षा आहे की या निवडणुकीत घोटा ग्रामस्थ आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे योगदान  देण्याचे स्वप्न पूर्ण करतील.
सौ.प्रतिभा अनिल मोरे सरपंच पदाच्या उमेदवार,घोटा..
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *