पहूर येथे राहुलरॉय मुळे  यांनी विद्यार्थ्यांना वाटले  रीडिंग टेबल्स कार्ड 

Khozmaster
1 Min Read
पदरमोड करून तालुक्यातील प्रत्येक शाळेत पोहोचण्याचा संकल्प .
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील सर्व विद्यालयात मार्गदर्शन करण्यात आले ध्येयाने वेडी झालेली माणसं इतिहास घडवीत असतात , असाच एक ध्येयवेडा तरुण आपले गॅरेज दुकान चालवून येणाऱ्या दैनंदिन मिळकतीतून समाजाचे आपण एक देणं लागतो या कृतार्थ भावनेतून वेळोवेळी सामाजिक कार्य करीत असतो या तरुणाचे नाव आहे राहुल रॉय मुळे .विद्यार्थ्यांचे पाढे पाठ व्हावेत यासाठी त्यांनी पदरमोड करून स्वखर्चाने पाढ्यांचे रीडिंग कार्ड्स तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.तालुक्यातील प्रत्येक शाळेत पोहोचण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून आज पहूर येथील डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात त्यांनी सदर कार्डचे विद्यार्थ्यांना वाटप केले .त्यांच्या या शैक्षणिक कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे .
0 9 4 8 7 9
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *