तालुक्यातील जि. प. उच्च प्राथ. शाळा दोल्हारी बुद्रुक शाळेतील मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला
पालघर प्रतिनिधी सौरभ कामडी
विक्रमगड जिल्हा संकुल पालघर येथे झालेल्या मुंबई विभाग शालेय कबड्डी मुलींच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत विक्रमगड तालुक्यातील जि. प. उच्च प्राथ. शाळा डोल्हारी बुद्रुक येथील मुलींनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.या मुलींनी द्वितीय क्रमांक आणून आपल्या शाळेचे नाव उंचावले आहे. म्हणून त्यांचे कौतुक करून पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्री. वाघ साहेब, तसेच तालुका क्रीडा अधिकारी माननीय श्री. आदरणीय श्री. अरविंद ठाकरे सर , दादडे केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय श्री. बोंबाडे साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश कानोजे सर, कोच प्रशिक्षक श्री. संतोष गणपत उमतोल सर, शाळेतील शिक्षकवृंद , गावाचे राज्य तथा जिल्हा सेक्रेटरी को. किरण गहला, सरपंच श्री. विलासजी गहला साहेब, उपसरपंच श्री. महेश खरपडे तसेच ग्रामस्थ यांच्याकडून द्वितीय विजेत्या मुलींचे कौतुक करून पुढील वाटचाली साठी गोड कौतुक केले आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
Users Today : 27