सहकार

Khozmaster
1 Min Read
सहकार ..
एका मागूनि दुसरे
परत करे पुरस्कार 
वाहे निषेधाचे वारे 
जागे करी सरकार
लेखणीचीअस्मिता 
पेटून  उठते अंगार
कुणीही  घे  विकत
नाहीत असे भंगार
लाभलेला पुरस्कार
मौल्यवान अलंकार
विचारार्थी  परतावा
नको  मात्र अहंकार 
तेंव्हा कसा  सुखाने
पुरस्कार ते स्विकार
खिरापत नाही मुळी
हाच हक्कअधिकार
करावा समग्र विचार
मगचं  करा धिक्कार 
साथीच्या या रोगाचा
रे फैलावू नये विकार 
क्षीर नीर  भाव असो
विचारीने  असहकार 
राजकारण मधे नको
असो  कुणी  सरकार 
– हेमंत मुसरीफ पुणे 
  ९७३०३०६९९६..
0 9 3 7 4 9
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *