मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्ववत करा; धोंडीराम राजपूत 

KHOZ MASTER
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर,शासनाने मागासवर्गीय ज्यात ओ,बी,सी, भटक्या-विमुक्त जाती , इत्यादींचा समावेश होतो अशा विद्यार्थ्यांना नियमित मिळणारी व्यवसायिक  अभ्यासक्रमची शैक्षणिक फिस व शिष्यवृत्ती रद्द केलेली आहे, शिष्यवृत्ती बंद करणे हा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय आहे,शासन एकीकडे म्हणते मुलां-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे तर दुसरीकडे त्यांची शिष्यवृत्ती बंद करते हे योग्य नाही, यामुळे बऱ्याच मुलीं व मुले आपले व्यावसायिक शिक्षण अर्धवट सोडत आहेत,कारण वरील वर्गात मोडणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीयआहे,शासनाने एस, सी व एस, टी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती चालू ठेवली मात्र  ओ,बी, सी,व भटक्या व विमुक्तांची शिष्यवृत्ती थांबविली हा दुजाभाव अन्यायकारक आहे,यामुळे शिक्षण गळती सुरू होईल,व मुले,मुली उच्च शिक्षण घेणार नाही,शिक्षण घेणे हा घटनात्मक हक्क  शासनाच्या या
धोरणामुळे नाकारल्या जात आहे,हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, वरील वर्गात मोडणारी कुटुंबे अजूनही  आर्थिक दृष्ट्या खूप मागासलेली आहेत आजही त्यांच्या घरात एकदाच चूल पेटते हे शासनाने जाणून घ्यावे,शासनाने शिष्यवृत्ती बंद न करता ती पूर्ववत चालू करावी अशी अपेक्षा आहे,
धोंडीरामसिंह ध राजपूत ,वैजापूर, औरंगाबाद
मो,९४२१३१२२४४.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *