पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था आयोजित कनसरी दिनदर्शिका २०२३ चा प्रकाशन सोहळा संपन्न

Khozmaster
4 Min Read
पालघर – सौरभ कामडी
पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था आयोजित आदिवासी कनसरी दिनदर्शिका २०२३ प्रकाशन सोहळा पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रकाशजी निकम, व विक्रमगड विधानसभा आमदार सुनिलजी भुसारा यांच्या हस्ते आज पेन्शनर भवन जव्हार येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुशी सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ डोके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, प्रमुख पाहुणे आमदार सुनील भुसारा यांचे विनायक शेळके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुशी सिंह यांचे सरस्वती भोये यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्या तथा माजी अध्यक्षा सुरेखा थेतले यांचे स्वागत विमल दिघा यांनी केले. संस्थेचे सल्लागार विनायक शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित मध्ये पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेची वाटचाल व आतापर्यंत राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच कनसरी दिनदर्शिका ही आदिवासी संस्कृती चे जतन व संवर्धन व्हावे यासाठी दिनदर्शिका मध्ये आदिवासी सण, देवता, संस्कृती, लेख, कविता यांचे लेखन संस्थेचे जेष्ठ नागरिक व अभ्यासक यांनी केले असून ही दिनदर्शिका युवा पिढीला मार्गदर्शक म्हणून त्याचा फायदा होईल, तसेच कनसरी दिनदर्शिका ही तळागाळातील आदिवासी बांधवापर्यत पोचवून आदिवासी संस्कृती संवर्धन कसे होईल याकरिता दरवर्षी प्रकाशित करीत असतो. तसेच संस्था विविध विषयावर आदिवासी बांधवाना जनजागृती करण्यासाठी काम करीत असते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कणसरी दिनदर्शिका चे प्रकाशन केले. त्यानंतर जिल्हा परिषद पालघर माजी अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी उपस्थित सर्व बांधवाना कनसरी दिनदर्शिका चे सुरवात कशी झाली तसेच त्याचे महत्व पटवून सांगितले व सर्वांनी ही दिनदर्शिका आपल्या घरी घेऊन त्याचे वाचन करावे असे आवाहन केले. आमदार भुसारा यांनी यावेळी पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था ही जेष्ठ व्यक्ती नी आदिवासी संस्कृती चे संवर्धन साठी काम करीत असून त्याचा प्रचार प्रसार करीत असल्याचे सांगितले तसेच आदिवासी भागात काम करीत असताना जनतेने ज्या अपेक्षेने निवडून दिले त्यानुसार आपल्या भागातील विविध समस्या घेऊन काम करीत असल्याचे सागितले तसेच मेडिकल कॉलेज, बिरसा मुंडा स्मारक याबाबत कामाचा पाठपुरावा करण्याचं काम सुरू आहे तसेच आदिवासी संस्कृती चे जतन व संवर्धन साठी कलादालन उभे केले जाईल असे सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी उपस्थित सर्व जेष्ठ नागरिक यांचे आभार मानले व पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था नी कनसरी दिनदर्शिका ही अतिशय सुंदर आणि आदिवासी समाजाविषयी बोली भाषा तसेच विविध आदिवासी देवता सण ,उत्सव याविषयी लेखन करून आज पालघर जिल्ह्यातील पहिली आदिवासी दिनदर्शिका प्रकाशित होत असून संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी सदर कनसरी दिनदर्शिका जास्तीत जास्त आदिवासी बांधव घेतील यासाठी सहकार्य केले जाईल तसेच त्यांनी जेष्ठ नागरिक यांचे विशेष कोतुक केले या सर्व वयात असून सुद्धा आज लेखन कला जोपासना करीत असून आजच्या युवकांनी हे काम केले पाहिजे तरच आपली संस्कृती टिकून राहिल, त्यांनी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यभार घेतला एक वेगळा ठसा उमटवून जव्हार-मोखाडा अतिदुर्गम भागातील समस्या ओळखून आपल्या भागातील अडचणी दूर करण्यासाठी सर्वांनी राजकिय पक्ष, भेदभाव विसरून एकत्र येऊन काम केल्यास आपल्या भागातील नागरिकांना न्याय मिळेल. लोकप्रतिनिधी नी काम करताना चौकटीत राहून काम न करता बाहेर जाऊन सुध्दा काम करावे लागत असल्याचे सांगितले. पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेच्या माध्यमातून जनजागृती चे काम उत्कृष्ट होत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी व जव्हार तालूका जेष्ठ नागरिक संस्था, जव्हार-विक्रमगड तालूका सेवानिवृत्त कर्मचारी सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी संस्थेचे उपसचिव नारायण शेंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कामडी यांनी केले.
0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *