सोयगाव परिसरात अवकाळी पावसाने कापसाच्या वाती, गहू, हरभरा, रब्बीसाठी मात्र वरदान

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
तालुक्यात व सावळदबारा परिसरात बुधवार, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके तर हिरावली गेलीच आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारंबळ उडाली.  शेतकऱ्यांच्या वेचणीसाठी आलेल्या कापसाच्या मात्र वाती झाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा एकदा अवकाळीच्या झटक्याने आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येते. दरम्यान, या पावसाने मोठया प्रमाणात पिकाचे नुकसान झाले असून काही पिकांना पाऊस वरदान ठरत आहे.या पावसामुळे सावळदबारा परिसरात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. तर पावसाने वेचणीसाठी आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. शेतात साठवून ठेवलेल्या मकांच्या गंज्या झाकण्यासाठी शेतकरी वर्गात एकचं धांदल उडाली होती तर वेचणीस आलेला कापूस पूर्णतः ओला झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसणार आहे.रब्बीचे गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसाठी कालचा पाऊस जीवदान देणारा असला तरी अन्य पिकांचे नुकसान झाल्याने कभी खुशी कभी गम अशी गत बळीराजाची झालेली आहे.ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशी पिकांवर बोंडअळीचे प्रमाण वाढलेल्याने कैऱ्या सडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर कापसाची आता चांगलीच वाट लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येते.परिसरत झालेल्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. अगोदरच अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे खरीप हंगामासह रब्बीतील पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
0 9 3 7 5 3
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *