सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागामधील एक छोट्याशा कोल्हे गाव चे आदिवासी कुटुंबातील शेखर छगन शिंदे.आर्मी मॕन यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल आर्मी अविएशन चे वरिष्ठ अधीकारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.शेखर शिंदे हे खुप धाडशी आणि मेहनती जाबाज आर्मी जवान आहे आर्मी बद्दल माहिती नसतांना सुध्दा परिस्थिती वरती मात करुन एक आदिवासी कुटुंबातील पाचोरा , तालुक्यातील कोल्हे गाव चे शेखर शिंदे यांनी स्वता खुप मेहनत घेऊन कठीण परिश्रम करुन जिद्दीने काम कार्य केले आणि आज ते आर्मी मधे वरिष्ठ क्लार्क या पदावरती आहे. नाशिक येथे तोफखाना या ठीकाणी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल यांच्या हस्ते शेखर शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शेखर शिंदे यांनी त्यांची प्रत्येक जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडली त्यामुळे त्यांचे वरिष्ठ अधीकारी यांनी त्यांची स्तुती करुन त्यांना मेडल सन्मान चिन्ह देऊन आणि प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमादरम्यान सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या केलेल्या कामगीरी कार्याची पाचोरा तालुका आणि त्यांचे मुळ गाव कोल्हे परीसरातील सर्व जनतेकडुन आणि आदिवासी समाज , आदिवासी , संघटना यांच्या तर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत असुन त्यांच्या या कामगीरी कार्याची स्तुती करुन शुभेच्छा दिल्या जात आहे शेखर शिंदे हे सध्याला पाचोरा येथे राहतात त्यांचा स्वभाव हा राॕयल स्वभाव आहे हाच त्यांचा गोड राॕयल स्वभाव सर्वांना नेहमी अवडत असतो शेखर शिंदे यांच्या कामगीरी बद्दल त्यांच्या मित्रांतर्फे मोठा आनंद उत्सव साजरा केला जात आहे.
Users Today : 11