आ.सौ.श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन चिखली
पाकिस्तानचा विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांने भारताचे लोकप्रिय, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज 17 डिसेंबर रोजी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात चिखली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केलेल्या या निषेध आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, पाकिस्तानचे नकाशे व बिलावल भुत्तोचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद , बिलावल भुट्टो मुर्दाबाद , भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख, डॉ. प्रतापसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, सुरेश अप्पा खबुतरे भाजप नेते, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, सुरेंद्रजी पांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, रामदासभाऊ देव्हडे ज्येष्ठ नेते, शेख अनिस भाई जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, अजय कोठारी अध्यक्ष धनश्री नागरी पतसंस्था, शिवराज पाटील, प्रा. विरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सुहास शेटे माजी नगराध्यक्ष, ॲड. दिलिप यंगड, पंजाबराव धनवे जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा, सागर पुरोहित शहराध्यक्ष युवा मोर्चा, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, किशोर जामदार तालुका सरचिटणीस भाजप, विजय खरे जिल्हा मीडिया प्रमुख, अक्षय भालेराव, भारत शेळके जिल्हा कर्यकारिणी सदस्य, अनुप महाजन, हेमंत कुचेरिया,सत्नारायण लढ्ढा, सुदर्शन खरात, ॲड. संजय सदार, विजय नकवाल, अंकुश तायडे, विनोद सीताफळे तालुका सरचिटणीस भाजप, विष्णु पाटिल घुबे तालुका उपाध्यक्ष भाजपा, श्याम वाकदकर, शुभम खबुतरे, संजय अतार, रमेश अकाळ, हरीभाऊ परीहार शहर उपाध्यक्ष भाजपा, भारत दानवे, सिद्धेश्वर ठेंग, योगेश झगडे, शैलेश सोनुने, श्याम दिवटे, सूरज थोरवे, शंकर रुद्रकर, शिवराज साप्ते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 18