बुलढाणा जिल्हयातील 261 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 78 टक्के मतदान 2 लाख 56 हजार 790 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Khozmaster
2 Min Read
जिल्हयातील सर्वचं प्रमुख् राजकिय पक्षासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रंगीत तालीम समजल्या जाणा-या 261ग्रामपंचायत निवडणुकांसाठी रविवार 18 डिसेंबर रोजी जिल्हयातील 842 मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साढे सात वाजेपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेचा प्रारंभ्भ धिम्या गतीने झाला असलातरी सकाळी दहा वाजेनंतर मतदानाला गती आली. या मतदान प्रक्रिये दरम्यान दुपारी साढे तिन वाजेपर्यंत 68.11 टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी साढे पाच वाजेपर्यँत ही टक्केवारी 78 टक्के पर्यँच पोहचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मतदानासाठी मतदान केंद्रावर युवक, युवतींची गर्दीचे सुख:द चित्र दिसले तर दुसरीकडे महिला, ज्येष्ठ नागरिकांचा देखील मतदान करण्यासाठीचा उत्साह दिसून आला. मतदान प्रक्रिये दरम्यान जिल्हयात कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.बुलडाणा जिल्हयातील एकुण 278 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र यातील 17 ग्रामपंचायती अविरोध झाल्या. उर्वरित 261 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. यामध्ये बुलडाणा तालुका 10 ग्रापं, चिखली 23, देउळगांव राजा 17, सिंदखेडराजा 29, मेहकर 47, लोणार 39, खामगांव 16, शेगांव 10, जलगांव जामोद 18, संग्रामपूर 19, नांदुरा 13, मोताळा 11 व मलकापूर तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या समावेश आहे. 261 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 377025 मतदार असून त्यामध्ये 177609 महिला व 199414 पुरूष मतदारांचा समावेश आहे. दुपारी साढे तिन वाजे पर्यँत 377025 मधून 256790 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. ज्यामध्ये 126536 महिला व 130253 पुरूष मतदारांचा समावेश होता. सायंकाळी साढे पॉँच वाजेपर्यँत 78 मतदान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *