उमरा ग्रामपंचायतच्या ‌विविध कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची जिल्हाधिकारीकडे मागणी

Khozmaster
1 Min Read
सतिश मवाळ मेहकर
तालुक्यातील ग्रामपंचायत उमरा यांनी विविध मागण्या साठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे .दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर केल्याबद्दल फेर चौकशी दिनांक 22/8/22 तक्रार असताना निकृष्ट दर्जाचे उजाड वस्ती रोड तयार करून बिल काढून भ्रष्टाचाराची चौकशी होऊन अंदाजपत्रकानुसार रक्कम शासन दरबारी जमा करणे बाबत. अशा वर्कर पद भरण्यात बाबत.मालमत्ता क्रमांक ३०९ ही सरकारी जागा असताना मालकी  हक्काची नोंद कोण्या आधारांवर करण्यात आली . दलित वस्तीचा हायमास्क लाईट सरपंच पती यांच्या घरासमोर  कोणत्या आधारावर लावण्यात आला इत्यादी याबाबत चौकशी करून उचीत कार्यवाही साठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे ‌ . निवेदन कर्ते अरुण मोतीराम वानखडे यांनी  पंचायत समिती यांच्याकडे  वारंवार लेखी व तोंडी ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी  भ्रष्टाचार केल्याबात वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला पण संबंधित अधिकारी निकृष्ट दर्जाचे काम  व भ्रष्टाचार करणाऱ्यास पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप  निवेदन कर्ते यांनी केला आहे.तरी संबंधित निवेदन ची दखल न घेतल्यास 27/12/22  जिल्हा अधिकारी कार्यालय समोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून होणार्या परिणामास शासण जबाबदार राहील असे निवेदन कर्ते  यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *