मानवी वस्ती पासून दूर आंबाबरवा बीडमध्ये उत्कृष्ट सेवा

Khozmaster
2 Min Read
 जिद्दी वनरक्षक कु.रूपाली राऊत ला सुवर्णपदक
शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
 सोनाळा सातपुड्याच्या कुशीत दुर्गम असलेल्या भागात अंबाबरवा अभयारण्य आहे सातपुड्यात जीवाची परवा न करता सेवा देणाऱ्या रंगरागिनीची 27 सप्टेंबर रोजी नवरात्रात लक्षवेधी वृत्त प्रकाशित झाल्यामुळे त्यावर आता शासनाने मोहर उमटवली असून वन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांना प्रभावी कामाबाबत शासनाने सुवर्णपदक जाहीर केले आहे त्यामध्ये अंबा बारवा अभयारण्यात सेवा देणाऱ्या निडर महिला वनरक्षक कुमारी रूपाली राऊत ह्या एकमेव अमरावती विभागात सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत नऊ डिसेंबर रोजी महसूल व वन विभागाने सण 19 व 20 साठी ही निवड घोषित केली आहे त्याबाबत सोनाळा वनपरिक्षेत्र  अधिकारी कार्यालयात पत्र प्राप्त झाले असून सुवर्णपदक प्राप्त कुमारी रूपाली राऊत यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्वतःच्या जीवाची परवा न करता सातपुड्यातील दुर्गम आदिवासी भागात सेवा देणाऱ्या वन्यजीव विभाग महिला कर्मचारी च्या ऊर्जास्रोत ठरल्या आहेत शेतकरी कुटुंबातील या रंगरागिनीचा संघर्ष पाहता त्यांच्या जिद्दीला सलाम होतो आहे की झाडी झुडपे हिस्त्र पशुपक्षी अशा उंच टेकड्या दऱ्याखोऱ्या असलेले अंबा बारवा व्याघ्र अभयारण्य आहे मानवी वस्ती पासून दूर असलेले वन्यजीव विभागाचे हे कोरक्षत्र आहे या अभयारण्यात जिजाऊच्या लेकी रागिनी निडरपणे पुरुष कर्मचाऱ्यांच्या समावेश जिद्दीने ते शासकीय सेवा देत आहेत अबाबरवा अभयारण्य चार महिला वनरक्षक आहेत त्यातील कुमारी रूपाली राऊत या वनरक्षकाकडे अत्यंत दुर्गम अंबा बारवा बिट आहे सन 2008 पासून त्या सेवेत आहेत मध्य प्रदेश लागून अंबा बारवा बिट आहे ऐथे सेवा देणे म्हणजे प्रचंड जिंकरिचे काम आहे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातून शासकीय सेवेत दाखल झालेले आहेत त्यांच्या कर्तुत्वाने त्यांनी वन्यजीव विभाग याकडे कर्तव्यदक्ष म्हणून वरिष्ठाकडे लौकिक मिळवला असल्याचे सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांनी सांगितले वन्यजीव विभागात सेवा अत्यंत खडतर अशी आहे मात्र या रणरागिणीची सेवा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे बाहेर जगापासून दूर सातपुडा हा अत्यंत मागास भाग आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *