नाशिक विभागीय स्पर्धेसाठी सुमित चिंचोले, राजकुमार जोशी व क्रॉस कंट्री संघ पात्र…!
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी,जळगांव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा दि.११ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगांव येथे नुकत्याच संपन्न झाल्या. जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वयोगट १९ वर्षाआतील खेळाडूंनी मैदानी स्पर्धेत विजयी घोडदौड केली.
सर्व विजयी खेळाडूंना राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारार्थी किशोर चौधरी, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक तथा जिल्हा सचिव राजेश जाधव, कार्याध्यक्ष डॉ विजय पाटील, जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, प्रा.इक्बाल मिर्झा, देविदास महाजन, राज्य पंच ममता शर्मा, पंकज वराडे, इंदिराबाई ललवाणी विद्या.क्रीडा शिक्षक जी सी पाटील, प्रा.समीर घोडेस्वार आदी. मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
विजयी खेळाडू असे:
११० मी.अडथळा शर्यत प्रथम- सुमित संजय चिंचोले (इ.१२ वी),
भाला फेक द्वितीय- राजकुमार रखमाजी जोशी (इ.१२ वी),
४ की मी.क्रॉस कंट्री संघ प्रथम- नेहा सुनील देशमुख (इ.१२वी), पुनम श्याम देशमुख (इ.१२ वी), अंजली गजानन पंडित (इ.१२ वी), प्रतीक्षा परमेश्वर तेली (इ.१२ वी), तनुजा जीवन चौधरी (११ वी), मेघा गजानन सुशिर (११ वी), ६ की मी. क्रॉस कंट्री- प्रतीक प्रमोद पाटील (१२ वी)
वरील सर्व खेळाडूंची नाशिक विभागीय स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अभिनंदन:इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र महाजन, सचिव श्री.किशोर महाजन,मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे,उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बी पी बेनाडे, जी डी कचरे यांनी केले.तर मार्गदर्शन क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, प्रा.समीर घोडेस्वार यांचे लाभले