२४ तासात रायपूर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेडया!
महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी
रोजी रायपूर पोस्टेला अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांसमोर
आरोपीला पकडण्याचे एक मोठे आव्हान होते.रायपूर बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे एका ५० वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून झाल्याची घटना १४डिसेंबरच्या रात्री उघडकीस आली
होती. आरोपीने ओळख पटू नये म्हणून महिलेचा मर्डर करतांना तिचा संपूर्ण चेहरा दगडाने ठेचला होता. या खूनाचा शोध घेण्याचे रायपूर पोलिसांसमोर एक
मोठे आव्हान ठरले होते. परंतु ‘कानून हे हात बहोत लंबे होते है या म्हणीप्रमाणे जिल्हा पोलिस अधिक्षक
सारंग आवाड व अप्पर पोलिस अधिक्षक
बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलिस
अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोस्टेचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी तपासचक्रे
फिरवित आरोपी बाळासाहेब बारहते याला २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या.आज १७ डिसेंबर रोजी त्याला बुलढाणा न्यायालयात हजर केले असता
न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली आहे. आरोपीने जुन्या बादातून खून केला, मात्र जुना बाद नेमका होता कोणता ? हे सस्पेंन्स मात्र
पीएम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल! रायपूर पोस्टेअंतर्गत असलेल्या सैलानी येथे औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील लताबाई कोतकर ह्या
वास्तव्यास होत्या. त्यांचा १४ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या दरम्यान जुन्या वादातून लताबाईचा खून झाला..आठ ते दहा दिवसापूर्वी मृतक महिला लताबाई कोतकर व आरोपी बाळासाहेब बारहते यांचे भांडण झाले होते. या वादातूनच आरोपीने
लताबाईला १३ डिसेंबरच्या रात्री वनविभागाचे भडगाव शिवारात असलेल्या जंगलात जळतण तोडण्यासाठी नेले होते, त्याच ठिकाणी आरोपीने महिलेच्या डोक्या�
कुऱ्हाडीने वार करून तीला ठार केले,
परंतु जुना वाद नेमका कोणता होता, यामध्ये आणखी आरोपी आहेत का, याचा तपास पोलिस प्रशासन करीत आहे.ठाणेदार आठवले टीमचे कौतूक..
ना सबूत, ना पुरावा, डोके दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केला होता. असे जिल्ह्याला हादरुन टाकणारे खून प्रकरण रायपूर पोस्टे. अंतर्गत असलेल्या वनविभागाच्या भडगाव जंगलात १४ डिसेंबरच्या रात्री घडले होते.आरोपीला पकडण्याचे आव्हान रायपूर ठाणेदार राजवंत आठवले यांच्यासमोर होते, परंतु त्यानी क्लिष्ट प्रकरण हाताळीत मृतक महिलेची
ओळख पटवून रात्रनंदिवस काम करीत तपासचक्रे फिरवून मृतक महिलेसोबत राहणाऱ्या आरोपीची माहिती मिळवीत त्याला २४ तासाच्या
आत बेड्या ठोकल्याची माहिती आज १७ डिसेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी पत्रकारांना देवून ठाणेदार राजवंत
आठवले व त्यांच्या टीमचे कौतूक केले.खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. मृतक महिलेचा मुलगा विकास अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, ठाणेदार
राजवंत आठवले यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत मिळालेल्या गोपनीय माहितीन्वये मृतक लताबाई कोतकर
यांच्यासोबत राहणारा बाळासाहेब मुंजाजी बारहते रा. साडेगाव ता. जिंतूर जि. परभणी ह. मु. सैलानी हा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीला
१६ डिसेंबर रोजी तान्यात घेवून त्याला पोलिसांचा दांडूका दाखविताच आरोपी ‘बाळू’ पोपटासारखा बोलू लागला व त्याने जुन्या वादातून लताबाईच्या डोक्यात कुन्हऱ्हाडीने वार करून तीला ठार मारले व ओळख पटू नये म्हणून महिलेचे डोके व चेहरा दगडाने ठेचून चेंदामेंदा केल्याची कबुली दिल्याने आरोपी
बाळासाहेब बारहतेला २४ तासात अटक केली होती. आज १७ डिसेंबर रोजी आरोपीला बुलढाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला
४ दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजवंत आठवले करीत आहेत.
Users Today : 18