चिखली: 28 पैकी 22 ग्रामपंचायतीवर फडकला काॅंग्रेसचा तिरंगा

Khozmaster
3 Min Read

राहुलभाऊ  बोंदे्र यांच्या कार्यालयासमोर ढोल नगायांच्या निनादात विजयाचा जल्लोष

जिल्हयात ग्रामपंचायतीच्या हाती आलेल्या निकालातुन काॅगे्रस पक्षावर मतदारांनी विष्वास दर्षवून प्रचंड मताधिक्यांने काॅगे्रसच्या उमेदवारांना विजयी केले. काॅगे्रसला मिळालेल्या विजयात नुकत्याच जिल्हयातुन गेलेल्या भारतजोडो यात्रेचा प्रभाव निष्चितच ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीवर झाल्याचे मत बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी यावेळी व्यक्त केले. चिखली तालुक्यातील 28 ग्रामपंचायती पैकी 22 व बुलडाणा तालुक्यातील मात्र चिखली मतदार संघातील 5 पैकी 4 ग्रामपंचायतीवर काॅगे्रसचा तिरंगा फडकला आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमदेवरांनी विजयीश्री खेचुन आणली आहे. या निकाला नंतर चिखली शहरात काॅगे्रस उमेदवारांच्या विजयाचा ढोल, नगाÚयाच्या निनादात प्रचंड अतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.चिखली विधानसभा मतदार संघातील 33 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यांकरीता दिनांक 18 डिसेंबर रोजी निवडणुक होवुन मतदान झाले. यात बुलडाणा तालुक्यातील मात्र चिखली मतदार संघातील 5 पैकी 4 ठिकाणी तर चिखली तालुक्यातील 28 पैकी 18 ठिकाणी काॅगे्रसचा तिरंगा फडकला आहे. यात काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमदेवारांनीही विजयश्री खेचून आनला आहे. चिखली तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या तितकेच लक्षवेधी ठरलेल्या उदयनगर ग्रामपंचायतीसह 17 ग्रामपंचायतीवर काॅग्रेसच्या उमदेवारानी बाजी मारली आहे. तर बुलडाणा तालुक्यातील मात्र चिखली मतदार संघात येणा-या 5 पैकी 4 ग्रामपंचायतीवर देखील काॅगे्रसचा तिरंगा फडकला आहे.चिखली तालुक्यात पार पडलेल्या निवडणुकीत उदयनगर, मोहदरी, कव्हळा, धोडप, आंधई, पिंपरखेड, डासाळा, किन्ही सवडत, भानखेड, बेराळा, महिमळ, वरखेड, सोनेवाडी, सातगांव भुसारी, भोकर, बोरगांव वसु, पांढरदेव, पाटोदा, रानअंत्री, चंदनपुर, कोनड, मिसाळवाडी, इसरूळ, मनुबाई, गुंजाळा या ग्रामपंचायतीचा समावेष आहे तर पेनसावंगी, मुंगसरी, करतवाडी, ढालसावंगी, या ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत. तर बुलडाणा तालुक्यातील इरला, ढालसावंगी, रूईखेड मायंबा, मौढाळा, चारही ग्रामपंचायतींतवर काॅगे्रसचा तिरंगा ध्वज फडकला आहे.बुलढाणा जिल्हयात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून जिल्हाभरातुन व चिखली मतदार संघातून निवडुण आलेल्या  काॅगे्रसच्या सर्व सरपंच व सदस्यांचे बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी अभिनंदन केले. चिखली विधानसभा मतदार संघातील सरपंच पदासह 16 सदस्यीय संख्याबळ असलेल्या उदयनगर ग्रापंचायतीच्या निवडणुकीने संपुर्ण जिल्हाभराचेच नव्हे तर मुंबानगरी पर्यंत सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले होते. थेट जनतेतून सरपंच पदाच्या अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या उदयनगर ग्रामपंचायतीत काॅगे्रस पक्षाचे उमेदवार मनोज लाहुडकर उर्फ गोलु यांनी 2100 मते घेत तब्बल 1500 हुन अधिक मतांनी भाजपाचा उमेदवाराचा पराभव केला. सरपंच पदाकरीता काॅगे्रसच्या मनोज लाहुडकरांसह, सावित्री राउत (भाजपा) तथा शेख युनूस शेख बु-हाण व मुजम्मीलखान अन्वरखान हे चोघे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *