तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे ता.प्रतिनिधी देऊळगाव राजा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना आयोजीत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या प्रसंगी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवणावर प्रकाश टाकत संत गाडगे बाबा यांचा जन्म शेंडगाव अमरावती येथे, तर ते गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने साधी रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत तसेच उपस्तीत रा. से. यो. स्वयंसेवकांमधून कु. समीक्षा कावरे, कु. वैष्णवी काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री निलवाल तर उपस्तीतांचे आभार प्रदर्शन धनेश ताकवले याने केले.या कार्यक्रमास रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम काकड, सह. कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, प्रा. लिकेश मेश्राम,प्रा. अश्विनी जाधव, प्रा. विजय पवार, प्रा. सचिन सोळंकी , प्रा. ऋतुजा जाधव व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आदेश भोंगे, संकेत वाघ, ऋषिकेश मापारी,ऋतुजा मानकर , साक्षी काळे व इतर विद्यार्थी आणि कर्मकारी उपस्तीत होते.
Users Today : 16