संचालक मंडळाकडून वॄध्दाश्रमास सढळ हाताने मदतीची अपेक्षा

Khozmaster
1 Min Read
सतिश मवाळ मेहकर 
चिखली रोडवर मेहकर जवळ चायगाव फाटा येथे विनाअनुदानित तसेच 80G सेवा उपलब्ध असलेले स्व. अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाचे 18000 स्क्वे. फुटाचे बांधकाम गेल्या आठ महिन्यापासून जलद गतीने सुरू आहे. ्वु्द्धाश्रमाचे बांधकाम  जवळपास पूर्णत्वास आलेले आहे तेव्हा आता रंगरंगोटी, इले व नळ फिटिंग, टाइल्स, संडास बाथरूम चे काम, प्रत्येक रूम मधील फर्निचर(त्यामध्ये पलंग टेबल सामान ठेवण्याकरता रॅक इतर ), किचनचे साहित्य, डायनिंग टेबल, स्टील सामान, इतर बरेच काम सध्या राहिलेले आहेत.तरी संचालक मंडळाकडून समाजातील दानशूर व्यक्तींना मदत करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
आज पर्यंत जी काम झाली त्यामध्ये बऱ्याच दानशूर लोकांनी आश्रमाला मदत केल्यामुळे  सदर आश्रम चे काम पूर्ण त्वाकडे वाटचाल करत आहे. त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार संचालक मंडळ मानत आहे. जी राहिलेली कामे आहेत त्याकरिता आश्रम च्या कार्यासाठी फुल नाही फुलांची पाकळी स्वरूपात देणगीरुपी मदतीची आवश्यकता आहे . ज्यांना कुणाला वृद्धाश्रमाच्या कामाला  मदत करावयाची  इच्छा असेल त्यांनी आमच्या संचालकाशी संपर्क Mob 9422182358
Mob 9421466421साधुन सढळ हाताने मदत करावी.आमच्या या उपक्रमाला  सामाजिक दायित्व समजून जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे.

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *