जपानी भाषेचे विद्यार्थी नोकरीसाठी जपानला रवाना

Khozmaster
2 Min Read
लक्ष्मी प्रल्हाद वेलफेर फाउंडेशन चिखली द्वारा संचालित जपानी भाषा प्रशिक्षण केंद्र चिखलीचे दोन विद्यार्थी नोकरीसाठी जपानला रवाना झाले त्यापूर्वी चिखली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ.श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला लक्ष्मी प्रल्हाद वेलफेर फाउंडेशन चिखली द्वारा सन डिसेंबर 2018 पासून भवर हार्डवेअर समोर जाफराबाद रोड चिखली येथे जपानी भाषेचे प्रशिक्षण सुरू आहे जपानी भाषा शिकल्यानंतर जपानमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळते संस्थेच्या 22 विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांची जपान मध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे त्यामध्ये आकाश पंडितकर गोपाल सपकाळ समाधान शेजुळ अमोल जाधव रितेश अवचार यांचा समावेश आहे यापैकी आकाश पंडितकर व गोपाल सपकाळ हे दिनांक 21. 12. 2022 रोजी दिल्लीवरून सकाळी 9 वाजता जपान साठी रवाना होत आहेत समाधान शेजुळ अमोल जाधव व रितेश अवचार हे फेब्रुवारी 2023 मध्ये जपान ला नोकरीसाठी जात आहेत दि. 17.12.2022 रोजी चिखली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्वेता ताई महाले पाटील व मा.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार फडणवीस साहेब यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर जी महाले साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेला नेहमीच सहकार्य करणारे व आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे राजेंद्रजी व्यास अध्यक्ष व्यास कॅन्सर ट्रस्ट चिखली यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी संस्था अध्यक्ष अँड सी पी इंगळे गजानन जाधव प्रा.प्रदीप जाधव शिक्षक शुभम वीनकर इतरांनी सहकार्य केले चिखली परिसरातून या विद्यार्थ्यांचे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *