सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
तालुक्यात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत तालुका कृषि अधिकारी तथा मंडळ कृषि अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी ज्वारी पिक शेतीशाळा सोयगाव तालुक्यातील मौजे – नांदागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुढील वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावयाचे असल्याने शेतीशाळा माध्यमातून पुढील वर्षाची पूर्वतयारी म्हणून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.सदरील शेतीशाळा मौजे – नांदगाव येथे दिनांक – २५-१२-२०२२ ते २०२३ तसेच नादांगाव येथे या कालावधीत राबविण्यात येत असून यात रब्बी ज्वारी पिकातील विविध अवस्थांचा विचार करून त्यानुसार बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, शेतकरी निवड, माती व पाणी परीक्षण, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, कामगंध सापळयांचा वापर, मित्रकीटक माहिती, किड व रोग व्यवस्थापन, किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, उत्पादन खर्च ताळेबंध या बाबतची माहिती वर्गवार देण्यात येत आहे.आज दिनांक २१-१२-२०२२ रोजी मौजे – नांदागाव येथे रब्बी पिक शेतीशाळेचा वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे यात प्रामुख्याने एच.बी.देशमुख कृषि पर्यवेक्षक, ए.एस.महाजन बी.टी.एम, एस.जी.वाघ, कृषि सहाय्यक अर्जुन सुरडकर, कृषि सहाय्यक मानसिंग भोळे सावळदबारा यांनी मार्गदर्शन केले तसेच आजच्या शेतीशाळा वर्गास गावातील प्रगतीशील शेतकरी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 16