रितेश कुमार टीलावत तालुका प्रतिनिधी तेल्हारा
ज्ञान/विज्ञानाची भरगच्च मेजवानी असलेली १० वी “राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद”S.V.P महाविद्यालय ठाणे येथे पार पडली……..प्रत्येकांमध्ये उपजतच एक शास्त्रज्ञ आणि संशोधक लपलेला असतो मात्र योग्य मार्गदर्शनाने त्याच्या जीवनाला योग्य आयाम मिळतो.ग्रामीण भागातील अशा”बालवैज्ञानिकांना” थेट शास्त्रनां पर्यंत पोहचण्याची आणि त्यांच्या सानिध्यात राहून मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची संधी “सुयश कोचिंग क्लास हिवरखेड” च्य माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली.तीन दिवस चालणाऱ्या ह्या बालविज्ञान परिषदेत ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले आणि वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.विज्ञानाला पर्याय नव्हता, नाही आणि नसेलही या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात विज्ञान हे फक्त दोन-विषयांशीच निगडित नाही तर ते सर्वसमावेशक आहे. वैद्यकीय तंत्रशिक्षण आणि संशोधनापासून तर शेती आणि खगोलीय पंचागापासून आपण दैनंदिन वापरत असलेल्या उपकरणां पर्यंत सर्वच बाबींचा अविभाज्य भाग आहे. कुठल्याही देशाला प्रगती करायची असेल तर वैज्ञानिक संशोधनाला महत्त्व द्यावेच लागेल.संशोधनातील ही गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन उद्योजक अशोक गोगटे यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित १० व्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेणे हे नेहमीच महत्त्वाचे असते कारण आ स्पर्धांमधून मिळालेला अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच उपयोगी पडतो तसेच अशा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.त्यांच्यात वैज्ञानिक जागृती होऊन ते अधिक चिकित्सक बनतात असे विचार याप्रसंगी व्यक्त केले.या परिषदेत “सुयश कोचिंग क्लास” हिवरखेड च्या अनिमेष ब्रम्हदेव हागे याच्या
“झोपाळू वाहन चालकांची सुरक्षा” या माँडेलला ५ हजार रुपयाचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच क्लासच्या राखी घनबहादुर हिला “टाकावूतून टिकाऊ वस्तू निर्मिती” च्या सादरिकरणाला.तर प्राची होपळ आणि पायल सोनोने यांच्या “आपल्या भागातील वृक्ष लागवड,संवर्धन आणि उपयोजन “या प्रकल्पाच्या सादरिकरणाला देखील गौरविण्यात आले.यावेळी विज्ञान सहलीच्या माध्यमातून मुलुंडच्या वाझे महाविद्यालयाला तसेच घोडबंदरच्या फुलपाखरू उद्यानाला भेट देण्यात .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी “सुयश कोचिंग क्लास” चे संचालक श्री.अमोल येऊल सर आणि सौ.स्नेहल येऊल यांना धन्यवाद दिले….
Users Today : 16