चिखली
समाजात जिवन जगत असताना आपण पाहतो आहे की स्त्रियांना पाहिजे असे स्वातंत्र नाही व स्त्रियांचा विकास पाहिजे तसा झालेला नाही .स्त्रियांचा विकास करायचा असेल तर त्यांना अध्यात्माची आवड असणे खूप गरजेचे आहे. त्या अनुषंगाने समाजात अध्यात्माची आवड निर्माण करण्यासाठी तसेच आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती होण्यासाठी 2001 साली संगीत विशारद राष्ट्रीय अध्यक्षा हिंदू रक्षक धर्म परिषद, मातृशक्ति रणरागिणी ह.भ.प रेणुका ताई जाधव यांनी
अनेक महिलांच्या सहकार्याने माऊली गुरुदेव महिला समिती स्थापन केली. व त्या समिती तर्फे गेल्या 11 वर्षापासुन आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छताअभियान ,वृक्षारोपण,व्यसनमुक्ती असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम भागवत कथा व कीर्तनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या वर्षी सुद्धा असाच भव्य दिव्य भागवत कथा व कीर्तन सोहळा सप्ताहाचे आयोजन दिनांक 24.12.2022 वार शनिवार ते दिनांक 31.12.2022 वार शनिवार या कालावधीत समर्थ खटकेश्वर महाराज संस्थान खामगाव रोड चिखली येथे करण्यात आले आहे. यामध्ये रोज भागवताचार्य रेणुकाताई जाधव यांची भागवत कथा दिनांक 24.12.2022 वार शनिवार ला सायंकाळी 4.00 ते 6.00 यावेळेत ह.भ.प प्रियका ताई खंदारे चिखली यांचे प्रवचन व रात्री 8.00 ते 10.00 या वेळेत ह.भ.प दुर्गा ताई मराठे मुक्ताईनगर यांचे कीर्तन, दिनांक 25.12.2022 वार रविवार ला सायंकाळी 4.00 ते 6.00 यावेळेत ह.भ.प उषा ताई राजपूत चिखली यांचे प्रवचन व रात्री 8.00 ते 10.00 या वेळेत ह.भ.प सुरेखा ताई पाटील वडशिंगी यांचे कीर्तन दिनांक 26.12.2022 वार सोमवार ला सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत ह.भ.प कमल ताई सिरसाट चिखली यांचे प्रवचन व रात्री 8.00 ते 10.00 या वेळेत ह.भ.प चंदा ताई गायकवाड आळंदी देवाची यांचे कीर्तन, दिनांक 27.12.2022 वार मंगळवार ला सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत ह.भ.प उर्मिला ताई कदम चिखली यांचे प्रवचन व रात्री 8.00 ते 10.00 या वेळेत ह.भ.प भारती ताई गाडेकर यांचे कीर्तन, दिनांक 28.12.2022 वार बुधवार ला सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत ह.भ.प संगीता ताई सपकाळ पेठ यांचे प्रवचन व रात्री 8.00 ते 10.00 या वेळेत ह.भ.प जयश्री ताई तिकांडे माझा ज्ञानोबा मालिका फेम संगमनेर यांचे कीर्तन दिनांक 29.12.2022 वार गुरुवार ला सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत ह.भ.प सुनीता ताई करवंदे चिखली यांचे प्रवचन व रात्री 8.00 ते 10.00 या वेळेत साध्वी सोनाली दिदी करपे चकलंबा बिड यांचे कीर्तन दिनांक 30.12.2022 वार शुक्रवार ला सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत पुष्पा ताई सुरडकर चिखली यांचे प्रवचन व रात्री 8.00 ते 10.00 या वेळेत ह.भ.प साध्वी सर्वेश्वरी देवी शिवालय आश्रम नांदूरा यांचे कीर्तन व 31.12.2022 वार शनिवार ला दुपारी 11.00 ते 1.00 या वेळेत ह.भ.प रेणुका ताई जाधव यांचे काल्याचे कीर्तन ,भजने व काकडा आरती इत्यादी कार्यक्रम होतील व दुपारी 2.00 वाजता महाप्रसाद राहील. तरी भागवत कथेचा व कीर्तन सोहळ्या चा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन माऊली गुरुदेव सेवा समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
Users Today : 26