लाखो रुपये किमतीच्या गुटख्याची पोलिसांनी केली होळी

Khozmaster
1 Min Read
चिखली
न्यायदंडाधिकारी चिखली यांच्या आदेशान्वये चिखली पोलिसांनी लाखो रुपये किंमत असंलेला गुटखा आज जाळून टाकला आहे. याबाबत सविस्तर असे की, प्रतिबंधक गुटख्यावर पोलिसांनी वर्ष २०२१- २२ मध्ये जवळपास ३० गुन्हे दाखल केले होते. आणि यामध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. सदर गुटखा पोलीस विभागाच्या चिखली येथील मालखाण्यात ठेवण्यात आले होते. सदर गुटख्यामुळे दुर्गंधी पसरु नये म्हणून पोलीस विभागाने न्यायदंडाधिकारी यांना पत्र व्यवहार करून जप्त केलेला गुटखा नाश करण्याची परवानगी मांगीतले असता न्यायदंडाधिकारी चिखली यांनी हा गुटखा नाश करण्याची परवानगी दिली असता आज दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर – औरंगाबाद हायवेवर स्थित डम्पिंग ग्राउंडवर संध्याकाळी पाच वाजेदरम्यान टाटा मैजिक एमएच २८ एबी ४२८४ व एम एच २१ एक्स ४३९४ या वाहनांतून सितार, वाह, राजनिवास, विमल, बाजीराव मस्तानी, नजर, रोकडा आदी प्रकारचा गुटखा आणून संपूर्ण जाळून त्याची राख करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रवीण तळी, एएसआय शशिकांत धारकरी, पो.कॉ. विनोद ब्राह्मणे उपस्थित होते.
0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *