पांढरदेव येथील शेतकरी पुत्र चेतन पाटील सरपंच पदी विराजमान
चिखली
डिसेंबर रोजी तालुक्यातील २३ ग्राम पंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झाले असता चिखली तालुक्यातील सर्वात कमी वयातील सरपंच पदी जनतेतून निवडून आलेले चेतन म्हस्के पाटील यांचा रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ स्वागत केले.
चेतन पाटील यांचे वडील स्व. राम पाटील हे पंच क्रोशीत जनता बस म्हणून प्रसिद्ध होते, समाजातील दिन दुबळ्या घटकांच्या सदैव मदतीस धावून जाणारे, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे सदैव किंग मेकर च्या भूमिकेत असणारे नवनिर्वाचित सरपंच चेतन यांचे वडील स्व.राम पाटील यांची पंचक्रोशीतील एक वेगळी ओळख होती, चेतन यांना मुळातच आपल्या आजोबा,पंजोबा वडिलांपासुनच समाज कार्याचे बाळकडू पाजण्यात आले असून त्यांचे पंजोबा गणपत पाटील,फकिरा पाटील, दौलतराव पाटील यांनी वेळोवेळी सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती त्याच बरोबर जगन्नाथ पाटील यांनी १९८३ मध्ये सरपंच पदाची जबाबदारी सांभाळली होती,आजोबा रामचंद्र म्हस्के यांनी बराच वर्ष पोलिस पाटील म्हणून होते तर डॉ.अच्युतराव म्हस्के हे त्या काळातील एम बी बी एस चे शिक्षण घेतलेले होते, त्यांचे वडील राम पाटील यांनी १९९७ मध्ये सर्वानुमते त्यांची पत्नी संगिता म्हस्के यांना सरपंच करण्याचे ठरविलेले असतांना देखील त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत गावातील अविवाहित तरुण युवक वाल्मीक आंम्भोरे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ टाकली त्यानंतर २००२ ला एस सी आरक्षण असल्यामुळे त्यांची वर्णी सरपंच पदी लागू शकली नाही परत २००७ ला त्यांनी संपूर्ण पॅनल निवडून आणलं परंतु स्वतः सरपंच न होता गावातील उच्चशीक्षित असलेले शिवणारायन म्हस्के यांना सरपंच पदाची संधी दिली,दोन वेळेस सरपंच पदाची संधी मिळून देखील राम पाटील यांनी स्वतः माघे राहून नवं तरुणांनाच संधी दिली त्यातच त्यांचं २०१० ला हृदयविकाराने निधन झालं त्यामुळे राम पाटील यांना सरपंच पदी बघण्याचं स्वप्न पांढरदेव येथील नागरिकांचं अपुर्णच राहील होत म्हणून यावेळेस राम पाटील यांचे चिरंजीव चेतन पाटील हे कृषी विषयात पदवीधर असून उत्कृष्ट शेतकरी उच्चशीक्षित तरुण असल्याने गावकऱ्यांच्या खास आग्रहाखातर ते निवडणूक रिंगणात उतरले व ही निवडणूक त्यांनी दोन वेळा सरपंच असलेल्या उमेदवाराला हरवून भरघोस मतांनी विजय मिळवला, त्यांचे मेव्हणे नितीन आंभोरे व वडिल राम पाटील यांच्याशी असलेले हित संबध व चेतन पाटील यांचे कार्य बघून चिखली तालुक्यातील सर्वात तरुण सरपंच म्हणून निवडून आल्याबद्दल माजी
कृषी,पणन,पाणीपुरवठा, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी फोन करून चेतन पाटील यांचा कौतुक केलं व क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केल,यावेळी नवनिर्वाचित सदस्य राजेश म्हस्के,भागवत म्हस्के, विश्वास म्हस्के,नितीन अंभोरे,सचिन पडघान,सचिन काकडे आदी उपस्थित होते.
Users Today : 16