जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 02 जानेवारी 2023 रोजी

Khozmaster
4 Min Read

बुलडाणा , 

राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कलागुणांना वाव देऊन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते.त्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत सन 1994 पासुन राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.  यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात.  याकरीता राज्यामध्ये जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्याचा संघ निवडण्यात येतो.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 15 वर्ष पुर्ण व 29 वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे दि.02 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार आहे.  सदर युवा महोत्सवामध्ये (1) लोकनृत्य (फोल्क डान्स), (2) लोकगीत (फोल्क साँग) या बाबींचा समावेश असुन त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सदर युवा महोत्सवामध्ये सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगम देणाऱ्याचे वय 15 ते 29 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.  लोकनृत्य सादर करणाऱ्या संघाने पुर्वा ध्वनी मुद्रीत टेप अथवा रेकॉर्डींगला परवानगी दिली जाणार नाही.  तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे लोकगीत व लोकनृत्य चित्रपटबाह्य असावे.  तसेच स्पर्धकांनी आवश्यक वाद्यवृंद व साहित्य सोबत आणावे.  कलावंतांनी आपले अर्ज दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, क्रीडानगरी, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे.  युवा महोत्सव मध्ये प्रथम क्रमांकाचा स्पर्धक विभागीय युवा महोत्सव करिता पात्र होईल.  सहभागी कलावंत (स्पर्धक) यांनी आपले प्रवेश अर्ज, मोबाईल नंबर, पत्ता, संस्थेचे नांव, रहीवासी दाखला, जन्मदाखला, इ. सह या कार्यालयामध्ये नोंदणी करावी.  तरी बुलढाणा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे यांनी लोकनृत्य व लोकगीत या बाबीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा असे श्री.गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा हे कळवितात.

29 डिसेंबर 2022 रोजी जिल्हास्तर कुराश क्रीडा स्पर्धेचे आयोजन 

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा तथा बुलडाणा जिल्हा कुराश असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने, जिल्हास्तर शालेय कुराश 14/17/19 वर्षे मुले व मुली क्रीडा स्पर्धांचे आयोजन 29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता तालुका क्रीडा संकुल, चिखली ता.चिखली जि.बुलढाणा येथे करण्यात आले आहे.  या स्पर्धेत 14 वर्ष मुले या वयोगटात वजन 25 कि.खा.,30 कि. खा., 35 कि. खा., 40 कि. खा., 45 कि. खा.,50 कि. खा., 55 कि. खा. आणि 55 कि.वरील, तर 14 वर्ष मुली या वयोगटात वजन 24 कि.खा.,28 कि. खा., 32 कि. खा., 36 कि. खा., 40 कि. खा.,44 कि. खा., 48 कि. खा. आणि 48 कि.वरील, 17 वर्ष मुले या वयोगटात वजन 45 कि.खा., 50 कि. खा., 55 कि. खा., 60 कि. खा., 66 कि. खा., 73 कि. खा., 40 कि. खा. आणि 73 कि.वरील, तर 17 वर्ष मुली या वयोगटात वजन 40 कि.खा., 44 कि. खा., 48 कि. खा., 52 कि. खा., 57 कि. खा., 63 कि. खा., 36 कि. खा. आणि 63 कि.वरील आणि 19 वर्ष मुले या वयोगटात वजन 45 कि.खा., 50 कि.खा., 55 कि.खा., 60 कि.खा., 66 कि.खा., 73 कि.खा., 81 कि.खा. आणि 81 कि.वरील, तर 19 वर्ष मुली या वयोगटात वजन 40 कि.खा., 44 कि. खा., 48 कि.खा., 52 कि.खा., 57 कि.खा., 63 कि.खा70 कि.खा.आणि 70 कि.वरील या वजनी गटामध्ये खेळण्यात येईल.बुलढाणा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, खेळाडू, पालक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांनी वरील वयोगट व वजनगटनिहाय प्रवेश अर्ज 28.12.2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे सादर करावेत तसेच 29 डिसेंबर 2022 रोजी तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावे व अधिक माहितीकरीता संघटना सचिव गुलाबराव राठोड मो.नं. 7385194999 यांचेशी संपर्क साधावा असे मा.श्री.गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा हे कळवितात.

 

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *