प्रतिनिधि / शिवानंद पवार देऊळगाव साकर्शा
मेहकर तालुक्यातील वरवंड येथे श्री वीरभद्र जनता परिवर्तन पॅनलचे सरपंच व सहा उमेदवारांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल सरपंच व नवनिर्वाचित उमेदवार यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.पॅनल चालक राजूभाऊ देशमुख , पॅनलचे आधारस्तंभ वसंताभाऊ देशमुख , प्रल्हाद राठोड नायक , हंजारी राठोड कारभारी , गुलाब राठोड , सुभाष पवार नायक , देवीचंद जाधव कारभारी , शेख अब्बासभाई , शेख शब्बीर भाई , जगदेव शीरसाठ , हरीभाऊ डोगरदीवे इत्यादींचे मोलाचे सहकार्य श्री वीरभद्र जनता परिवर्तन पॅनलला लाभले…..
सरपंच पदाचे उमेदवार डॉक्टर नागेश रामदास डवंगे यांचा जनतेमधून दणदणीत 262 मताने वीजय झाला.वार्ड क्रमांक 1 मधून अरुन प्रकाश जावळे 95 मताने विजयी . लताबाई मदन रत्नपारखी 90 मताने विजयी. शिल्पा हेमंत देशमुख 51 मताने वीजयी…
वार्ड क्रमांक 2 कौशल्याबाई सखाराम राठोड 250 मताने विजयी . रवीना अमरसिंग राठोड 245 मताने वीजयी . गजानन विठ्ठल राठोड 314 मताने विजयी.
वार्ड क 3. आशाबाई कैलास शिरसाट , गजानन तुकाराम डोंगरदीवे विठ्ठल लोडू डवंगे हे तीनही उमेदवार थोड्या मताने पराभूत झाले असून तरीही श्री वीरभद्र जनता परिवर्तन पॅनल सर्वांना सोबत घेऊन गावकऱ्यांना विश्वासात घेऊन हे पॅनल सदैव जनतेच्या विकास कामाच्या माध्यमातून जनतेची सेवा करेन असे मत जनता परिवर्तन चे मार्गदर्शक श्री राजुभाऊ देशमुख यांनी व्यक्त केले.
Users Today : 17