रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
हिवरखेड परोपकारी नागरिक समिती तसेच वेद प्रचारीनी सभा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2022 या चार दिवसीय इच्छा पूर्ती महायज्ञ , ऋग्वेद पारायण यज्ञाचे आयोजन हिवरखेड येथील अग्निहोत्र धाम , माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आले असून यात , पाणीनी प्रभात कन्या महाविद्यालय हैदराबाद येथील आचार्य सविता देवी , गुरुकुल नर्मदापुरुम मध्य प्रदेश येथील आचार्य योगेंद्र याज्ञिक, तसेच गुरुकुल पौंधा,देहरादून उत्तराखंड येथील आचार्य धनंजय जी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरहू यज्ञ संपन्न होईल. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत या चार दिवसीय इच्छापूर्ती महायज्ञात यजमान बनण्यास इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत वैदिक प्रवक्ता आचार्य योगेंद्र याद्निक, गुरुकुल नर्मदा पुरम यांचे व्याख्यान व भजन होणार आहे.
हिवरखेड परोपकारी नागरिक समिती व वेध प्रचारिणी सभा नागपूर द्वारा आयोजित इच्छापूर्ती महायज्ञ , ऋग्वेद पारायण यज्ञ हा यज्ञ पूर्ण भारतातील सर्वात मोठा यज्ञ असून हिवरखेड व परिसरातील नागरिकांचे सौभाग्य आहे की सदरहू यज्ञ हा एवढ्या छोट्या गावात प्रथमताच होत आहे तरी सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी व भक्तांनी या यज्ञात यजमान रुपी , किंवा आहुती देण्याकरिता आपले नावाची नोंद लवकरात लवकर समितीकडे करावी असे आवाहन या कार्यक्रमाला सेकडो भक्तांनी उपस्थिती दर्शवून यज्ञा आपले योगदान द्यावे असे आवाहन हिवरखेड समस्त वासीयांनी केली आहे.इच्छापूर्ती महायज्ञ , ऋग्वेद पारायण यज्ञाची पूर्णाहुंती दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे.
Users Today : 17