तंबाखू नियंत्रण पथकाची कारवाई
बुलडाणा,
बुलडाणा शहरातील 39 पानटपरीधारकावर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने आज, दि. 22 डिसेंबर 2022 रोजी कारवाई केली. यात त्यांच्याकडून 7 हजार 800 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.शहरातील मुख्य परिसर, बसस्थानक, संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, इकबाल चौक, भोंडे सरकार चौक, तहसील चौक आदी परिसरात ३९ पानटपरीधारकावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम 2003 नुसार ही कार्यवाही करण्यात आली.सदर कारवाई जिल्हा अंबलबजावणी पथकांर्तगत अन्न व औषध सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रामविजय राजपूत, शिपाई ओमप्रकाश साळवे, श्री. लेकुरवाडे, प्रवीण पडोळ, जगदेव टेकाळे, संजय तागवे, दिगांबर कपाटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक श्री.सरकटे सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख यांच्या चमूने ही कारवाई केली.
Users Today : 26