शेतक-यांच्या पिक विम्याच्या तक्रारी तालुका कॉग्रेसने केल्या कृषी अधिका-याच्या स्वाधीन

Khozmaster
2 Min Read

चिखली

बुलडाणा जिल्हयात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतक-यांची पिकांची प्रचंड नुकसान झाल्याने शेतक-यांच्या हाता तोंडाषी आलेला घास निर्सगाने हिरावून नेला. शेतक-यांनी रात्रदिन जागुन मोठ मोठया रांगा लावुन पिक विमा काढला, मात्र केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने या विमा कंपन्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतक-यांना विम्याची रक्कम मिळाली नाही, शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला. विमा काढलेल्या ज्या शेतक-यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही अषा विंचत असलेल्या शेतक-यांनी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी कॉग्रेस कमिटीकडे तक्रारी सादर करण्याच्या आवाहन केले होते. त्यानुसार चिखली तालुका कॉग्रेसने प्राप्त झालेल्या शेतक-यांच्या शेकडो तक्रारी आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या स्वाधीत केल्या आहे.खरीप हंगामात ऑगस्ट ते ऑक्टोंबर 2022 या तिन महिन्यात बुलडाणा जिल्हयात प्रचंड अतिवृष्टी झाली. यात जिल्हयातील शेतक-यांच्या सोयाबीन, कापुस, उडीद, मुग, फळबाग पिकांचे अतोनात नुकसान झाले. यात काही ठिकाणी तर जमीनीही खरडुन गेल्या. पिक, धान्य करपले तर काही ठिकाणी सडून गेले. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर जमीनीवरील शेतमालाचे नुकसान झाले. जिल्हयातील बहुतांष शेतक-यांनी आपल्या पिकाचा विमा काढुन घेतला होता. मात्र अनेक विमा कंपन्याकडुन शेतक-यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असुन त्यांना अदयापही पिक विम्याचे पैसे देण्यात आले नाही. राज्यातील शेतक-यांचा पिक विम्याचा प्रष्न अतिषय किचकट व जटील झालेला आहे, शेतक-यांना पिक विमा मिळून देण्यासंदर्भात केंद्रातील भाजपाची मोदी सरकार व राज्यातील षिंदे-फडणवीस सरकार योग्य ती भुमीका निभावत नसल्याने पिक विमा कंपन्यानी शेतक-यांची प्रचंड लुट चालविली आहे. एकंदरीत बुलडाणा जिल्हयातील पिक विम्यापासुन वंचित असलेला शेतकरी डबघाईस येवुन आर्थीक कांडीत अडकला आहे. विमा काढलेल्या ज्या शेतक-यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही अषा विंचत असलेल्या तसेच तक्रारदार शेतक-यांना तात्काळ पिक विम्यांची रक्कम देण्यात यावी असे निवेदनाव्दारे कळवीत शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी तिव्र आंदोलन छेडण्याचा ईषाराही दिला आहे.तलुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे पिक विम्यापासुन वंचित असलेल्या शेतक-यांच्या तक्रारी सुपूर्द करतेवेळी तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम पठाडे, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष एजाज मंत्री, साहेबराव पाटील, भारत खासभागे, शेख हबीब भाई, संजय गिरी, विकी तोंडे, अमोल मोरे यांच्यासह असंख्य पदाधिका-यांची उपस्थिती होती.


0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *